पुणे ZP च्या “या” गटात निवडणुकीच्या तोंडावरच “झाकली मूठ” उघडली;पतीचं “ते” कांड उघड,राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवार पत्नीवर ओढवली मोठी नामुष्की

पुणे ZP च्या “या” गटात निवडणुकीच्या तोंडावरच “झाकली मूठ” उघडली;पतीचं “ते” कांड उघड,राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवार पत्नीवर ओढवली मोठी नामुष्की

पुणे

पहिल्या पत्नीशी वैवाहिक नाते कायदेशीररित्या अस्तित्वात असताना पतीने जाणीवपूर्वक व हेतुपुरस्सर दुसऱ्या महिलेशी दूसरे लग्न करुन सहजीवन सुरू केले आणि सोशल मीडिया माध्यमांवर दुसऱ्या महिलेला पत्नी म्हणून दर्शवून फोटो, स्टेटस व पोस्ट अपलोड करुन मानसिक छळ केल्याप्रकरणी पिडीत पत्नीने पतीसह दहा जणांवर फिर्याद दिल्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे दुसरी पत्नी जिल्हा परिषद निवडणूकीत एका राष्ट्रीय पक्षाकडून उमेदवारी मिळवून लढत देत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून सिध्देश्वर नामदेव काळभोर (पती),पुनम बाबुराव गायकवाड (दुसरी पत्नी), नवनाथ नामदेव काळभोर (दीर),स्नेहल नवनाथ काळभोर (जाऊ) सर्व रा.लोणी काळभोर ता.हवेली जि.पुणे.तसेच पतीचे नातेवाईक निर्मला चौधरी (पतीची मावशी, रा. लोहगाव,पुणे) नंदा उत्तम बोत्रे(पतीची मावशी),उत्तम बोत्रे(मावशीचे पती),दत्तात्रय रंगनाथ भाडळे (पतीचे मामा), ऋषाली निलेश बोत्रे(मावस जाऊ) व प्रणाली स्वप्नील बोत्रे (मावस जाऊ) सर्व राहणार सालुमालु पारगाव, ता.दौंड जि.पुणे.यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार पती सिद्धेश्वर काळभोर व पुनम गायकवाड हिने दि 23 जून 2020 रोजी व त्यानंतर तिच्या मोबाईल वरुन माझे मोबाईल वर अश्लील भाषेत व्हॉट्सॲप मेसेज व टेक्स्ट मेसेज करुन विनयभंग करण्याचे उद्देशाने हे अश्लील स्वरुपाचे मेसेज पाठवले आहेत व त्याला पतीचा पाठींबा आहे.तसेच पतीसह वरील दहा जणांनी पिडीतेच्या पतीने दुसरे लग्न केल्यानंतर आजपर्यंत तिचा मानसिक छळ केला आहे.

तसेच त्यांना तिच्या वैध विवाहाची पूर्ण माहिती असूनही त्यांनी पुनम गायकवाड यांचे सोबत एकत्र काढलेला फोटो व पुनम गायकवाड हिचे नावापुढे सिध्देश्वर काळभोर असे नाव लावत असल्याचे फोटो स्टेटसला ठेवला व अनेक ठिकाणी फ्लेक्स लावुन त्यास पाठिंबा दिल्याने तिची बदनामी झाली आहे.

गावामध्ये जिल्हा परिषद प्रचारादरम्यान घरोघरी फिरुन पुनम गायकवाड ही पिडीतेच्या नव-याची पत्नी असले बाबत प्रचार करीत आहे व व्हॉट्सॲप स्टेट्सला तसे ठेवत आहे.पिडीतेची दोन मुलेही मोबाईलवर व्हॉट्सॲप स्टेट्स पहात असल्याने त्यांचेही मनावर गंभीर परिणाम होत असून, नमुद इसमांनी तिचा मानसिक छळ केला आहे अशी तक्रार दिल्यामुळे वरील 10 जणावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *