बोपगाव येथील दत्ताञय फडतरे यांच्या पाठपुराव्याला यश
पुणे
बोपदेव घाट- सासवड पी.एम.पी मार्गावरिल साईमंदिर येथे अधिकृत बसथांबा देण्याबाबत व बसथांब्यांवर पाटी बसवून अनेक वर्षोपासुन प्रवाशांची होणारी गैरसोय दुर करण्याची मागणी बोपगाव येथील दत्ताञय फडतरे यांनी पी.एम.पी.एम.एल.चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक यांच्यांकडे केली होती, यामागणीला पुणे महानगर परिवहन महामंडळाने हिरवा कंदील दाखवला असुन नुकतीच पी.एम.पी प्रशासनाच्या वतीने बसस्टाॅपवर पाटी बसविण्यात आली आहे.
कोंढवा बोपदेव घाट – सासवड मार्गावरिल गायकवाड वस्ती – माणिकगड बसथांब्यांदरम्यान असणार्या साईमंदिर येथील हाॅटेल चैतन्य मिसळ समोर पी.एम.पी बसेस थांबविण्यात याव्यात, दैनंदिन प्रवाशांची गैरसौय दूर करण्याची मागणी फडतरे यांनी पी.एम.पी प्रशासनाकडे मागणी केली होती, सा मागणीची पी.एम.पी ने दखल घेतली आहे .चार वर्षापासुन या मार्गावरुन बसेस धावत आहेत.
परंतु ,तेव्हापासुन प्रवाशांची गैरसोय सुरुच होती,नुकताच प्रशासनाने बसथांब्यांला अधिकृत दर्जा दिला असुन थांब्यांवर पाटी ही बसविण्यात आली आहे.काञज, व स्वारगेट आगारातुन सुटणार्या बसेस भिवरी व बोपगाव या गावांयादरम्यान असणार्या साईमंदीर येथील बसस्टाॅपवर थांबणार आहेत. या परिसरात स्थानिक रहिवाशी व पुणे शहरातुन वास्तव्य करणार्या नागरिकांचे प्रमाण वाढत आहे.
वस्तीवरिल प्राथमिक शिक्षक ,शिक्षिका व शाळा, काॅलेज विद्यार्थी ,जेष्ठ नागरिक यांसाठी बसथांबा नसल्यामुळे प्रवाशांची बसस्टाॅप अभावी मोठी गैरसोय होत होती,ती गैरसोय आता दुर झाली आहे. प्राथमिक शिक्षक – शिक्षिका ,शालेय विद्यार्थी ,स्थानिक नागरिकांनी दत्ताञय फडतरे यांचे आभार मानले आहेत. याकामी चैतन्य मिसळ व अमृततुल्य चे मालक रमेश फडतरे व महेश फडतरे यांचे विशेष सहकार्य लाभले.