दौंड
दौंड तालुक्यातील यवत परिसरामध्ये असणाऱ्या विविध भागातील विद्युत रोहित्र शेजारील बॉक्स मधून कॉपर पट्ट्या चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे ,दिनांक 2 डिसेंबर रोजी हॉटेल घरकुल शेजारील ढाबा डीपी शेजारील डीपी बॉक्स मधून कोपर पट्ट्या चोरीला गेल्या होत्या.
त्यानंतर दिनांक 4 डिसेंबर रोजी पहाटेच्यावेळी स्टेशन रोड, पोस्ट ऑफिस, ग्रामपंचायत वॉटर सप्लाय, रायकर मळा या ठिकाणच्या डीपी बॉक्स मधून पहाटेच्या वेळी कॉपर पट्ट्या चोरीला गेल्या आहेत.
या सर्व कॉपर पट्ट्याची किंमत अंदाजे पंचवीस हजार रुपये असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरणचे कनिष्ठ अभियंता काकडे यांनी दिली.
यवत येथील महावितरणचे कर्मचारी सचिन राजगुरू यांनी काकडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ केडगाव येथून डीपी बॉक्स तसेच कोपर पट्ट्या तात्काळ उपलब्ध करून देऊन खंडित झालेला विद्युत पुरवठा पुन्हा पूर्वरत केला त्यामुळे सचिन राजगुरू यांचे परिसरात कौतुक होत आहे.
वरिष्ठांच्या सहकार्यामुळेच हे शक्य होत असल्याचे सचिन यांनी सांगितले.