पुणे
खेड तालुक्यातील दुर्गम भागातील एका गावात १३ वर्षांच्या मुलीवर नराधम बापाने अत्याचार केला होता. याप्रकरणी आरोपीला राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळं खळबळ उडाली होती.
आई आणि भाऊ बाहेरगावी गेल्याने दारुच्या नशेत अल्पवयीन मुलीवर तिच्या वडिलांनी अत्याचार केले होते.
दरम्यान, याप्रकरणी न्यायालयात सुनावणी दरम्यान सरकारी वकील व्हि.एन.देशपांडे यांनी पीडितेच्या बाजूने युक्तीवाद केला.१२ जणांची साक्ष ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.