पुणे
पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात एका डॉक्टरने रुग्ण महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील कात्रज भाागातून धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुण्यात डॉक्टरने रुग्ण महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादाय घटना घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे. डॉ. अमित असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. या घटनेने पुण्यातील कात्रज परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी डॉ. अमितचे कात्रज भागात क्लिनिक आहे. या क्लिनिकमध्ये पीडित महिला तपासणीसाठी गेली होती. त्यावेळी या पीडित महिलेची डॉक्टरसोबत ओळख झाली. त्यानंतर या डॉक्टरने या पीडित महिलेकडे मोबाईल क्रमांक मागितला.
त्यानंतर महिलेने तिचा मोबाईल क्रमांक डॉक्टरला दिला. आरोपी डॉक्टरने महिलेला पुन्हा रुग्णालयात बोलावले. त्यावेळी आरोपी डॉक्टरने महिलेला धमकावून तिच्यावर अत्याचार केला.
या प्रकरणी आरोपी डॉक्टरच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. तसेच भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी डॉक्टरला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.