पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार !!!!! “या” बड्या नेत्याच्या फार्म हाऊसवर नातेवाईकानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार !!!!! “या” बड्या नेत्याच्या फार्म हाऊसवर नातेवाईकानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे

शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेतावर आणि फार्महाऊसवर कामाला असणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलीवर नात्यातील तरुणाने जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. याप्रकरणी शिक्रापूर पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.

विशाल गायकवाड असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील भाजपचे नेते गणेश बिडकर यांच्या मालकीची शेती आणि फार्महाऊस असून पीडितेला न्याय मिळून देण्यासाठी दबाव येईल, असा गंभीर आरोप भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनी केलाय. मात्र या प्रकरणाबद्दल कोणताही दबाव नसल्याचे स्पष्टीकरण शिक्रापूर पोलिसांनी दिलं आहे.

शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शेती आणि फार्महाऊसवर विशाल गायकवाड आणि पीडित मुलीचे आई वडील कामासाठी तिथे राहतात.

हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक असून पीडित मुलीचे आईवडील कामानिमित्ताने बाहेर गेल्यानंतर त्यांच्या नात्यातील नराधमाने अप्लवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. याप्रकरणाची माहिती शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *