पुणे
पोटच्या मुलाने वृद्ध वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे.
८५ वर्षीय वडिलांवर चाकूने हल्ला केल्यानंतर डोक्यात वरवंटा घातल्याचा आरोप आहे. मात्र हत्येचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
नववर्षातील अवघ्या सहा दिवसात जन्मदात्यांची हत्या करण्याची ही तिसरी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सख्ख्या मुलाने जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याच्या घटनेमुळे पुणे हादरलं आहे. राजगुरुनगरातील राहत्या घरातच गुरुवारी हा प्रकार घडला.
४६ वर्षीय मुलाने आपल्या ८५ वर्षीय पित्यावर आधी चाकूने हल्ला केला. त्यानंतर डोक्यात वरवंटा टाकून त्यांची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलं आहे.
शंकर बोऱ्हाडे असं हत्या झालेल्या पित्याचं नाव आहे, तर मुलगा शेखर बोऱ्हाडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मात्र घरगुती वादातून ही हत्या घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सध्या राजगुरुनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.