दौंड
दौंड तालुक्यातील कानगाव याठिकाणी उसाची लागण करीत असताना वीज अंगावर पडुन शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना नुकतीच घडल्याची माहिती पाटस पोलिसांनी दिली आहे.
सुवर्णा सोमनाथ कोर्हाळे असे या महिलेचे नाव आहे.कानगाव परिसरात रविवारी विजेच्या कडकडाटासह व वादळी वार्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.
पावसाच्या तोंडावर शेतकर्यांची उसाची लागवड व पेरणी करण्यासाठी लगबग चालु आहे.रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शेतकरी उसाची लागवड करित असताना सुवर्णा कोर्हाळे यांच्या अंगावर वीज पडल्याने मृत्यु झाल्याची घटना घडली.
दरम्याण या घटनेनंतर ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी मांडवगण फराटा येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले.अशी माहिती पाटस पोलिस चौकीचे पोलिस हवालदार संजय देवकाते, पोलिस शिपाई समिर भालेराव यांनी दिली आहे.