पुणे जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार!!!        हुंड्यासाठी तिच्या डोळ्यात, तोंडात आणि कानात पाण्यात मिसळून मिरची पावडर टाकली

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार!!! हुंड्यासाठी तिच्या डोळ्यात, तोंडात आणि कानात पाण्यात मिसळून मिरची पावडर टाकली

पुणे

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून पैशासाठी एका महिलेचा अतोनात छळ केल्याचे प्रकरण सध्या समोर आलेले आहे. कोथरूडमधील हे प्रकरण असून विवाहित महिलेचा हुंड्यासाठी अमानुषपणे छळ करण्यात आला. तिच्या डोळ्यात तोंडात आणि कानात पाण्यात मिसळून मिरची पावडर टाकली गेली असे महिलेचे म्हणणे आहे.

कोथरूड परिसरात राहणाऱ्या बावीस वर्षीय एका विवाहित महिलेने यासंदर्भात पोलिसात तक्रार दिलेली असून तिच्या म्हणण्यानुसार हुंड्याच्या मागणीसाठी सासरच्या व्यक्तींनी आपला अमानुषपणे छळ केला. माहेरच्या मंडळीकडून सतत पैशांची मागणी पूर्ण होत नसल्या कारणाने सासरच्या व्यक्तींनी आपल्या छळाला सुरुवात केली होती .

त्यामध्ये रोज आपल्याला मारहाण केली जायची इथपर्यंत आपण सहन केलं मात्र त्यानंतर सासरच्या व्यक्तींनी चक्क पाण्यात मिरची पावडर टाकून आपल्या डोळ्यात तोंडात आणि कानात देखील ही पावडर टाकली. पीडित महिलेचा विवाह कार्तिक साहेबाने याच्याशी 2021 मध्ये झालेला होता त्यानंतर काही दिवस व्यवस्थित गेल्यानंतर सासरच्या व्यक्तींकडून तिचा पैशासाठी छळ सुरू करण्यात आला.

महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर तिचा पती नागेश कार्तिक साहेबाने (वय २३ ) , रत्ना कार्तिक साहेबाने ( वय 42 ) आणि महादेवी जाधव ( वय 58 वर्ष ) लिंबराज भिसे ( वय 58 वर्ष) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

कायद्याने हुंडा देण्यास आणि घेण्यास कायद्याने बंदी असून हुंडा प्रतिबंधित कायदा 1961 च्या कलम तीन अंतर्गत हुंडा दिला किंवा घेतला तर कमीत कमी पाच वर्ष मुदत कारावासाची आणि कमीत कमी 15 हजार रुपये अथवा हुंड्याच्या मूल्याइतकी रक्कम यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रकमेची शिक्षा करण्याची तरतूद आहे मात्र अद्यापही ग्रामीण ठिकाणी तसेच शहरी भागात देखील असे प्रकार उघडकीला येत असल्याने समाज व्यवस्थेसाठी ही धोक्याची घंटी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *