पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना!!!!पुण्याजवळील “या” गावात मुलगा मोबाईल बघत होता आई,ओरडली म्हणून आईचं डोक भिंतीवर आपटून केला खून;आईने गळफास घेतल्याचा रचला बनाव

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना!!!!पुण्याजवळील “या” गावात मुलगा मोबाईल बघत होता आई,ओरडली म्हणून आईचं डोक भिंतीवर आपटून केला खून;आईने गळफास घेतल्याचा रचला बनाव

पुणे 

पुण्यातील लोणी काळभोर परिसरात उरुळी कांचन येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारावीत शिकणारा मुलगा अभ्यास करताना मोबाईल बघत होता. त्यामुळे त्याच्या आईने त्याला रागावले. त्या रागातून मुलाने स्वत:च्या आईचे डोके भिंतीवर आदळून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव मुलाने रचला; पण शवविच्छेदन झाल्यानंतर हा खून असल्याचे उघड झाले. मुलाने केलेला बनाव त्याच्यावरच उलटला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.

या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.ही घटना उरुळी कांचन येथील माऊली कृपा इमारतीत १५ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली. तस्लिम जमीर शेख (वय ३७, रा. उरुळी कांचन) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. जिशान जमीर शेख (वय १८, रा. उरुळी कांचन) असे बारावीतील मुलाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारी रोजी जमीर शेख हे नमाज पठणासाठी गेले होते. त्यांची धाकटी मुलगी बाहेर गेली होती. मुलगा जिशान हा घरात अभ्यास करत असताना मोबाईल पाहत होता. तो मोबाईल पाहत असल्याचे पाहून त्याची आई (तस्लिम जमीर शेख) त्याच्यावर चिडली आणि त्याला रागावली. तसेच तिने त्याला कानाखालीदेखील मारली. त्यामुळे जिशानला राग आला. त्याने आईला जोरात भिंतीकडे ढकलले आणि तिचा गळाही दाबला. त्यातच तिचा मृत्यू झाला.

आपली आई हालचाल करत नसल्याचे त्याच्या लक्षात येताच जिशानने ब्लेडने तिचे मनगट कापले. मात्र, काही उपयोग झाला नाही. त्यानंतर त्याने एक वायर फॅनला लटकवली आणि आईचा मृतदेह त्याच्या खाली ठेवला. काही वेळात वडील घरी आले. त्यांना आईने गळफास घेतला असल्याचे त्याने सांगून तिचा मृतदेह आपण खाली उतरवल्याचे सांगितले. त्यानंतर जिशानच्या वडिलांनी पत्नीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांना संशय आल्याने डॉक्टरांनी ससून हॉस्पिटलला नेण्यास सांगितले. शवविच्छेदन झाल्यानंतर तस्लीम जमीर शेख यांचा खून झाल्याचे उघड झाले. मुलाने केलेला बनाव त्याच्यावरच उलटला.

तस्लिम शेख यांनी आत्महत्या केल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली होती. मात्र, डॉक्टरांच्या एका संशयाने हत्येचा पर्दाफाश झाला. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *