पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना!!!आई-वडिलांचे भांडण अन् “या” गावात चिमुकल्याचा बिबट्याने घेतला जीव

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना!!!आई-वडिलांचे भांडण अन् “या” गावात चिमुकल्याचा बिबट्याने घेतला जीव

पुणे

शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे बिबट्याच्या हल्ल्यात वंश राजकुमार सिंग (वय ७ वर्ष) या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील गोकुळनगर-दगडवाडी रोड वरील संदिप अशोक घाडगे यांच्या मालकीच्या वाघेश्वर गूळ उद्योग येथे मजुरी साठी वास्तव्यास असलेल्या राजकुमार सिंग मूळ (रा. मुज्जफरनगर, दिल्ली) यांचा मुलगा वंश राजकुमार सिंग (वय ७ वर्ष) हा त्याच्या आई व वडील यांचे घरघुती वादावेळी वडील हे आई रेखा हिस मारावयास धावले असता वंश हा घराच्या बाजूला असलेल्या उसाचे शेतात घाबरून पळाला होता.

शुक्रवारी (ता. १८) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तेथील शेतात दडून बसलेल्या बिबट्याने सावज समजून त्याच्यावर अचानक प्राण घातक हल्ला केला. त्यावेळेस त्याचे वडील राजकुमार सिंग यांनी आरडा-ओरडा करून बिबट्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याने त्याला न जुमानता वंश यास सुमारे 400 फूट अंतरावरील उसाच्या शेतात फरपटत नेले.

याबाबाबतची माहिती तेथील गुऱ्हाळ मालक संदिप घाडगे यांनी वन विभागाला दिली. वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी तात्काळ घटना स्थळी पोहचून मृत अवस्थेत असलेल्या वंश याचे शवाचे पाहणी करून परिसरातील वन्यप्राणी बिबटच्या अस्तित्वाची खात्री केली.मृत वंशचे शव शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय, शिरूर येथे पाठविण्यात आले.

घटना स्थळी जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी तात्काळ भेट दिली व पाहणी करून सरपंच व उपसरपंच व वनकर्मचारी यांच्याशी सदर घटने विषयी चर्चा करून मार्गदर्शन केले. सदर ठिकाणी हल्ला केलेल्या बिबट्याला पकडण्या करिता ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून त्याचा शोध घेऊन तात्काळ पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्याच्या सूचना दिल्या. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी 12 पिंजरे, 9 कॅमेरा ट्रॅप लावण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

दरम्यान, भीमा नदीच्या आजूबाजूच्या परिसरात बिबट्यांची असलेली मोठी संख्या आहे. हे लक्षात घेता, शेतातील व लगतच्या प्रत्येक घराभोवती भरपूर प्रकाश दिवे लावणे, घराभोवतीचे व शेत रस्त्याच्या दोन्ही बाजूचे संपूर्ण गवत काढून टाकणे, दिवस उगवण्यापूर्वी आणि मावळल्यानंतर शक्यतो घराबाहेर न पडणे, अपरिहार्य असल्यास सोबत टॉर्च व मोठी काठी बाळगणे या सुचनांचे गांभीर्याने पालन ग्रामस्थ यांनी करावे, असे कळकळीचे आवाहन जुन्नर वन विभागाकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *