पुणे
जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. आज सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास अज्ञातांनी नवनाथ उर्फ पप्पू शेठ रेणुसे याची गोळ्या घालून हत्या केली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास दोन अज्ञात दुचाकीवरून आले. या अज्ञातांनी नवनाथ उर्फ पप्पू शेठ रेणुसे यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेला रेणुसे याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटना स्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, हल्लेखोर दुचाकीवरून फरार झाले आहेत. या आरोपींचा शोध पोलीस घेत असून नेमकं कोणत्या कारणामुळे हे हत्याकांड रचण्यात आले हे अद्याप समजू शकले नाही.