पिडीत कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढा देणार:दौलतनाना शितोळे

पिडीत कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढा देणार:दौलतनाना शितोळे

पुणे

दौंड तालुक्यातील पाटस येथील रामोशी समाजातील दोन तरुणांची निर्घुन हत्या झाली होती याच्या निषेधार्थ दौंडतहसील कार्यालया समोर जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भव्य निषेध सभेचे आयोजन करण्यातआले होते ही निषेध सभा यशस्वीरित्या संपन्न झाली असून जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी उठवलेलाआवाज महाराष्ट्र शासना पर्यंत पोहोचवू आसे आश्वासन दौंड तहसीलदार यांनी दिले आहे.

पाटस प्रकरणातील अनेक गुन्हेगार आरोपी यांना आटक केली आहे काही संशयित आरोपी फरारच आहे त्यांना तात्काळआटक करावी व मोक्याअंतर्गत कारवाई करावी तसेच ही केस फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालावी यासाठी जय मल्हार क्रांतीसंघटना पाठपुरावा करणार व पिडीत कुटूंबाला न्याय मिळेपर्यंत जय मल्हार लढा देणार, 

तसचे महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये, तालुक्यामध्ये रामोशी-बेरड समाजातील युवकांना आणि निराधार बांधवांनाअशा प्रकारचा अन्याय सहन करावा लागत आहे राजकीय व प्रस्थापित लोकांकडून रामोशी-बेरड समाजाची जाणीवपूर्वककुचंबना केली जात आहे तरी या सर्व घटनांचा विचार करून रामोशी-बेरड समाजाला ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत संरक्षणमिळावे यासाठी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आवाज उठवून व शासन दरबारी पाठपुरावाकरण्यात येणार असल्याची माहिती जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षलोकनेते.मा.श्री.दौलतनाना शितोळे साहेब यांनी आपल्या भाषणातून दिली आहे.

तसेच या निषेध सभेला वंचित बहुजन आघाडी व वडार समाज पाटस ग्रामपंचायत यांच्या वतीने पदाधिकारी उपस्थितराहून जाहीर सक्रिय पाठिंबा दिला आहे.

यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *