पुरंदर
पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे याठिकाणी २१/०८/२०२१ रोजी केलेल्या हल्ल्यातील फरार आरोपी अक्षय उर्फ गोट्या संभाजी खेनट याला जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे.
जेजुरी पोलिस स्टेशनवरुन मिळालेल्या माहितीनुसार पारगाव मेमाणे याठिकाणी घरात घुसुन हल्ला केल्याप्रकरणी १६ आरोपीपैकी १३ आरोपींना अटक केली होती.त्यापैकी फरार आरोपी अक्षय उर्फ़ गोट्या संभाजी खेनट याने पारगाव मेमाणे येथील अल्पवयीन मुलीला दि.०२/१०/२०२१ रोजी लग्नाची फुस लाऊन पळवुन नेले होते.
सदरचा आरोपी हा अल्पवयीन मुलीसह पुणे येथील धनकवडी भागात असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख,अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक सुनिल महाडीक यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे तपास सफौ चंद्रकांत झेंडे,पोलिस हवालदार मुन्ना मुत्तनवार,पोकॉ प्रविण झेंडे यांना आरोपीचा शोध घेण्यास पाठविण्यात आले.
त्यानुसार गोपनीय पद्धतीने तपास करुन पीडीत मुलगी व आरोपीस ताब्यात घेउन पोलिस उपनिरिक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी अटक केली आहे.पीडीत मुलीस वैद्यकिय तपासणीकरीता ससुन हॉस्पिटल पुणे येथे पाठविण्यात आले आहे.
सदर आरोपीविरुद्ध लैंगीक अत्याचार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असुन आरोपीस पाच दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे.