पुरंदर
पुरंदर तालुक्यातील पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसास्थापन सेवा संघ शाखा पुरंदर यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी 22 जुलै पासून काम बंद आंदोलन चालू करण्यात आले आहे. याचे निवेदन पुरंदर तालुका विद्यमान आमदार माननीय संजय जगताप आणि संबंधित खात्याकडे देण्यात आले. पुरंदर तालुका पशुधनासाठी महत्त्वाचा तालुका मानला जातो. पुरंदर तालुक्यामध्ये पशुपालक हा अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. त्याच अनुषंगाने खाजगी पशुवैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या डॉक्टरांकडून सदर संप पुकारण्यात आला आहे.
खाजगी पशुवैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या लोकांवर निबंधक MSVC यांचेकडून विनाकारण नाहक बदनामी व त्रास देत आहेत. संविधानाने भारतीय पशुवैद्यक कायदा 1984 च्या कलम 30(ख) व कलम 57 (1) या बाबतीत दुर्लक्ष करून व वर्तमानपत्रात चुकीची माहिती प्रसारित करून आमची बदनामी करण्यात येत आहे. वेळोवेळी संबंधित अधिकारी यांना पत्रव्यवहार करून देखील कोणतीही दखल किंवा खुलासा केला जात नाही तरी संबंधित पत्राचे चौकशी करण्यात यावी.
खाजगी पदविकाधारक पशुवैद्यकीय व्यक्ती यांना भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा 1984 च्या कलम 3(ख)1अहर्ता धारण करणाऱ्या पशुवैद्यकीय व्यक्ती यांना राज्य शासनाने तातडीने मायनर व्हेटर्नरी सर्व्हिसेस साठी नोंदणीकृत परवान्याची व्यवस्था करावी. पदवीधारक बेरोजगारी प्रमाण वाढत असल्या कारणाने विविध खाजगी तसेच शासकीय विभागात व रोजगाराच्या संधी उपलब्ध कराव्यात.
महाराष्ट्रात भारतीय पशुवैद्यकीय परिषद 1984 कायद्यात पदवीधारकांसाठी दुरुस्ती करण्यास महाराष्ट्र राज्यातील पशुधन हित लक्षात घेऊन केंद्र सरकारला प्रवृत्त करावे. पदवीधारक यांचे साठी शेती व शेतकरी आयोगाने अध्यक्ष डॉ. स्वामीनाथन यांनी शिफारस केलेली नॅशनल लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट कौन्सिल ची स्थापना करून पदवीधारक नोंदणीकृत करण्यात यावे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या 2009 च्या अधिसूचनेत 22 कामे नोंदणीकृत पशु वैद्यकाच्या मार्गदर्शन व देखरेखीखाली करण्याची अट शिथिल करावी. बारावी विज्ञान नंतर तीन वर्षाचा अभ्यासक्रम निर्माण करून शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण करण्यासाठी तरतूद करण्यात यावी तसेच मुक्त स्वर्ग स्वयंपूर्ण व अद्ययावत राहण्यासाठी मुक्त विद्यापीठामार्फत पुढील प्रशिक्षणाची सोय करण्यात यावी अशा मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
शेतकऱ्यांचे होत आहेत हाल:- पशुवैद्यकीय सेवा पुरवणारे खाजगी डॉक्टर आणि सरकारी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. पुरंदर तालुक्यातील कोळविहिरे गावातील सचिन सुभाष भोसले यांची गाई मृत्युमुखी पडली आहे. सदर गाईवर वेळीच उपचार होऊ शकला नसल्यामुळे गायीचा दुर्देवी अंत झाला आहे. तालुक्यातील गोपालक सध्या चिंतेत आहेत.
फोटो:- आमदार संजय जगताप यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना पदाधिकारी