पुणे
किल्ले शिवनेरी गडावर भगवा ध्वज असावा यासाठी राज्य सराकार आणि केंद्र सरकारकडे वारंवार मागणी करुन कुठल्याच उपाययोजना होत नसल्याने खासदार डॉ.अमोल कोल्हेंनी तीन दिवसांवर आलेल्या शासकीय शिवजन्मोत्सवावर बहिष्कार घालणार असल्याची घोषणी केली आहे.
किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सवावर शासकीय संपल्यानंतर शिवभक्तांमधून भगवा ध्वज खांद्यावर घेऊन गड चढणार असून कुठल्याच शासकीय कार्यक्रमात सहभाग होणार नसल्याचे सांगत खासदार अमोल कोल्हे निषेध व्यक्त करणार आहे.
किल्ले शिवनेरी गडावर लाखो शिवभक्तांच्या उपस्थित शिवजन्मोत्सव साजरा होत असताना भव्य भगवा ध्वज असावा अशी आग्रह मागणी खासदार कोल्हेंनी राज्य आणि केंद्र सरकारकडे केली. शिवाय याबाबत संसदेत आवाजही उठवला मात्र यावर कुठलीच घोषणा झाली नसल्याने कोल्हेंनी आता पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवजन्मोत्सवाचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर असताना कोल्हेंच्या या भुमिकेमुळे पुन्हा नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.