पुणे
बारामती शहर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाला सावकारी कायद्यानुसार दाखल असलेल्या गुन्ह्याचे चार्जशिट बाजूने पाठविण्यासाठी दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ३० हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. एसीबीने रविवारी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी लाचखोर पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदिपान अभिमान माळी (वय ५६) असे कारवाई केलेल्या लाचखोर पोलीस अधिका-याचे नाव आहे. ते बारामती शहर पोलीस ठाण्यात नेमणूकीस आहेत. या प्रकरणी एका ४२ वर्षीय तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती.
तक्रारदार यांच्या पत्नीने एकाविरूद्ध सावकारी कायद्यानुसार तक्रार दाखल केली होती. त्यानुसार दाखल गुन्ह्यातील चार्जशिट बाजूने पाठविण्यासाठी सहायक पोलीस उपनिरीक्षक संदीपान माळी यांनी 40 हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती 30 हजार रूपये स्वीकारताना माळी यांना रंगेहात पकडण्यात आले आहे . सदर घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे .