जालना
अंबड तालुक्यातल्या गोदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाथरवाला बु. परिसरातील गोदा पात्रात तहसीलदार यांच्या पथकांनी वाळू माफियाच्या तीन किन्ही पकडल्या. याचा राग आल्याने आज अंबड तहसीलदार यांच्या दालनात घुसून तहसीलदार कडवकर यांना बेदम मारहाण करून त्यांच्यावर दोघांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज दुपारी अडीच वाजल्याचा सुमारास घडली.
तहसिल कार्यालयात तहसीलदार यांच्या दालनात ही घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खबळ उडाली उडाली.अंबड तहसीलचे तहसिलदार कडवकर आपल्या दालनात दुपारी अडीचच्या सुमारास जेवण करत असताना तहसिल कार्यालय परिसरात आलेल्या दोघांनी तहसीलदार कडवकर यांच्या दालनात घुसुन दालनाचा दरवाजा बंद केला. यानंतर तहसीलदार कडवकर यांना बेदम मारहाण केली. तहसीलदार कडवकर यांनी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत तहसिल कार्यालयाच्या आवारात आरडाओरड करत धाव घेतली.
तरीदेखील तहसिल कार्यालयाच्या आवारात ही त्यांना बेदम मारहाण करून हे हल्लेखोर कार घेऊन पसार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे.हल्ला करणारा हा ठाकरे गटाचा अंबड तालुका प्रमुख असल्याची माहिती समोर आले आहे. या हल्ल्यात तहसीलदार जखमी झाले असून या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
वाळू माफियाकडून थेट तहसीलदार यांना तहसिल कार्यालयात मारहाण झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अंबड पोलिस अधिक तपास करत असून हा हल्ला ठाकरे गटाचे अंबड तालुका प्रमुख पंकज सोळुंके यांनी केला असल्याचा आरोप महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यासह तहसीलदार यांनी केला आहे.