बारामती
आतापर्यंत सरकारी काम करण्यासाठी बाहेरच्या माणसाकडुन लाच मागीतली जायची, मात्र आता कार्यालयातील कामगाराकडुन अधिकारी त्याच्या औषधांची बिलं मंजुर करण्यासाठी लाच मागतो ईथपर्यंत ही लाचखोरीची पाळेमुळे रोवली गेली आहेत.
कार्यालयातील कामगारालाच लाच मागीतल्याचा प्रकार बारामती तालुक्यात उघडकीस आला आहे.अभियंता अधिकार्याने कार्यालयातील कर्मचार्याचे मेडिकल बिल कमी करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागीतली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यासंदर्भात कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
संजय नारायण मेटे व पोपट दशरथ शिंदे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. संजय मेटे हा इंदापुर तालुक्यातील उपसा सिंचन योजनेच्या पळसदेव येथील कार्यालयात उपअभियंता आहे.
त्याच्या कार्यालयातील एका कर्मचार्याचे मेडिकल बिल मंजुर करण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली त्यामध्ये या अभियंत्याने लाच मागीतल्याचे सिद्ध झाले त्याच्यावर सापळा रचुन त्याला लाच घेताना पकडण्यात आले.