धक्कादायक !!!!!     “मी माझं आयुष्य संपवतोय” असे म्हणत पत्नीला कॉल करत पतीने थेट मारली उडी ; संपवले आयुष्य

धक्कादायक !!!!! “मी माझं आयुष्य संपवतोय” असे म्हणत पत्नीला कॉल करत पतीने थेट मारली उडी ; संपवले आयुष्य

अकोला

काटेपूर्णा नदीत उडी घेऊन मी माझं आयुष्य संपवत आहे, असा फोन पत्नीला करत थेट पतीने नदीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही दुर्देवी घटना अकोला जिल्ह्यातील दोनद गावात घडली. रवी बाबाराव निखाडे (वय ३५. रा.कृषीनगर, अकोला) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध पथकाने मृतदेह नदीच्या बाहेर काढला आहे. तर पिंजर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

रवी निखाडे हे घरुन आपल्या मोटर सायकलने निघाले, दुपारी बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद गावात पोहोचले.तेथून त्यांनी आपल्या पत्नीला फोन करत ‘मी’ दोनद’ला काटेपुर्णानदीत आत्महत्या करत आहे, असं सांगितलं. पत्नी काही बोलण्याच्या आतच त्यांनी फोन ठेवून नदीत उडी घेतली.

दरम्यान, नातेवाईकांनी या घटनेची माहिती मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती दिली. क्षणाचाही विलंब न करता अवघ्या १५ सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. परंतु काहीही दिसुन आले नाही. दिपक सदाफळे यांनी नातेवाईकांकडे बारकाईने विचारपूस केली असता. रवी निखाडे हे आपल्या दुचाकीने दोनदलाच गेले असेल अशी खात्री दिली.

यावेळी सदाफळे यांनी रवी निखाडे यांच्या मोबाईलवर संपर्क केला.मात्र, फोनवर कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु थोडावेळाने नातेवाईक आले, तेव्हा रवी निखाडे यांची गाडी दोनद खु. येथील मंदीराजवळ लावलेली दिसून आली. निखाडे यांची पत्नी आणि नातेवाईक आरडाओरडा करू लागले.

तेव्हा अलिकडच्या काठावर आसरा देवी मंदिराजवळ दिपक सदाफळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नदी परिसरात शोध मोहीम राबवली.अखेर निखाडे यांचा मृतदेह अजनाच्या झाडीत आढळून आला.

याची माहिती पिंजर पोलिसांना देण्यात आली. तात्काळ मृतदेह बाहेर नदीतून बाहेर काढण्यात आला. दरम्यान, या प्रकरणात पिंजर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे, तर रवी निखाडे यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्यापही गुलदस्तात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *