धक्कादायक !!!! पोलिसाला लाथाबुक्क्याने केली मारहाण

धक्कादायक !!!! पोलिसाला लाथाबुक्क्याने केली मारहाण

पुणे

पिंपरी चिंचवडमध्ये एका साध्या वेशात गस्त घालत असेलल्या गुन्हे शाखेच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला एकाने जमिनीवर पाडून लाथा बुक्क्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद लक्ष्मण ढिल्लोड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस शिपाई ज्ञानेश्वर गाडेकर हे पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचमध्ये कार्यरत आहेत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ते साध्या वेशात देहूरोड बाजार येथे गस्त घालत असताना ही घटना घडली.

आरोपी अरविंद ढिल्लोड हा बालाजी लंच हॉटेलमध्ये जेवणाचे पार्सल घ्यायला आला होता. जेवण पार्सल मिळण्यास विलंब होत असताना महिला लंचहोम चालक यांना आरोपी ग्राहक अर्वाच्य भाषेत बोलत होता. यावेळी पोलीस ज्ञानेश्वर गाडेकर हे त्याठिकाणी उभे होते. त्यांनी आरोपी अरविंद याला महिलेशी चांगल्या भाषेत बोल असे सांगताच आरोपी अरविंदने पोलिसांच्या कानशिलात लगावून दिली. या मारहाणीची घटना लंच होममधील सीसीटीव्ही कॅमऱ्यामध्ये कैद झाली आहे.

यावेळी पोलीस कर्मचारी आरोपीच्या गालावर हात ठेवतात. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारीचा भडका उडतो. हाणामारीच्या वेळी पोलीस कर्मचाऱ्याला आरोपी लाथाबुक्यांनी मारहाण करतो. यावेळी रस्त्याने ये-जा करणारी माणसं तिथे जमतात. बघ्यांची मोठी गर्दी तिथे होते. त्यानंतर आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *