१५० जणांना चष्म्याचे वाटप : अजित युवा विकास प्रतिष्ठानचा उपक्रम
मयुर कुदळे जेजुरी प्रतिनिधि
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित युवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने दौंडज (ता. पुरंदर) येथे घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिविराम ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला आहे.
कोरोना काळात सर्व सामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेता यावी तसेच अजित दादांचा वाढदिवस हा सेवा संकल्प दिन म्हणून साजरा व्हावा या प्रमुख उद्देशाने पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या अध्यक्षतेखाली दाँडज येथील महिला अस्मिता भवनात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मोफत औषधोपचारांसह१५० जणांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक प्रा. दिगंबर दुर्गाडि, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे, अजित युवा विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे, विराज काकडे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव, ज्येष्ठ नेते दामुआण्णा कदम, हनुमंत पवार,ग्रामपंचायत सदस्य विजय फाळके, युवा कार्यकर्ते अमोल कदम, विक्रम फाळके, नेत्र चिकित्सक डॉ. संतोष रणवरे, डॉ. तमन्ना शेख, गौतम भोसले, अक्षय माळवदकर, महेंद्र माने, सोपान दगडे, उद्धव कदम, अमोल फाळके संदेश पवार, अनिकेत सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.