दुखःद !!!!            पुरंदर तालुक्यातील “या” गावातील मामा – मामी नंतर सात वर्षाच्या भाचीवरही काळाचा घाला

दुखःद !!!! पुरंदर तालुक्यातील “या” गावातील मामा – मामी नंतर सात वर्षाच्या भाचीवरही काळाचा घाला

पुरंदर

पुरंदर तालुक्यात काल झालेल्या वादळ वाऱ्यात पिंपळे येथे  झाड अंगावर कोसळून नवविवाहित जोडप्याचा मृत्यु झाला होता. यामध्ये त्यांची सात वर्षाची भाची गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना रात्री दोन वाजलेच्या सुमारास तिचाही मृत्यू झाला आहे.

काल दिनांक २२ एप्रिल रोजी सायंकाळी  पुरंदर तालुक्यात  पाउस व वादळ वारा सुरु झाला होता. यावेळी  परिंचे येथील   रेनुकेश गुणशेखर जाधव  वय २९ वर्ष  व त्याची पत्नी सारिका रेनुकेश जाधव वय  २३  वर्ष त्याच बरोबर त्याची भाची ईश्वरी संदेश देशमुख हे सासवडहून परिंचेकडे मोटार सायकलवर जात होते.

साधारण  सात वाजलेच्या सुमारास पिंपळे येथून जात असतांना रस्त्या शेजारील अर्धवट जळलेले वडाचे झाड त्यांच्या अंगावर कोसळले. यामध्ये रेनुकेश व सारिका यांचा जागीच मृत्यू झाला होता . तर त्यांची भाची (बहिणीची मुलगी)  गंभीर जखमी झाली होती )  बेशुध्द अवस्थेत असल्याने ईश्वरी हिला  पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले होते .

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे तीन जीवांचा अंत : वृद्ध माता पिता झाले पोरके 
पुरंदर तालुक्यातील बांधकाम  विभाग रस्त्यावरील वाहतूक  सुरक्षे बाबत अत्यंत दुर्लक्ष करीत आहे. तालुक्यात यापूर्वी सुद्धा अश्या प्रकारच्या घटना घडल्या आहेत. रस्त्याच्याकडेला असलेल्या धोकादायक झाडांचा वेळो वेळी सर्वे करून त्यावर उपाय योजना करायला हव्यात. मात्र अर्धवट जळलेली झाडे व पूर्ण वाळलेली झाडे अनेक ठिकाणी यमदूत म्हणून आज ही उभी आहेत. जळालेली किंवा वाळलेली झाडे काढली तर बांधकाम  विभागाच्या कारवाईला लोकांना सामोरे जावे लागते.त्यामुळे लोकही त्याकडे दुर्लक्ष करतात. आता तरी बांधकाम विभागाने रस्ता सुरक्षा बाबत आढावा घेऊन आणखी दुर्घटना होण्या अगोदरच  उपाय योजना करायला हव्यात.

मात्र आज पहाटे दोन वाजलेच्या सुमारास या मुलीचा ही मृत्यु झाल्याची माहिती सामोर येत आहे. या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. काल झालेल्या या घटनेने जेष्ठ पत्रकार गुनशेखर जाधव यांचा एकुलता एक तरुण मुलगा  व सून गमवावी लागली आहे . आयुष्याच्या संध्याकाळी पोरके पण येण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे   हे घडले आहे.

अर्धवट जळलेले झाड अगोदरच काढले असते तर ही दुर्घटना टळली असती काल झालेल्या या घटनेने जेष्ठ पत्रकार गुनशेखर जाधव यांचा एकुलता एक तरुण मुलगा  व सून गमवावी लागली आहे . आयुष्याच्या संध्याकाळी पोरके पण येण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे   हे घडले आहे.अर्धवट जळलेले झाड अगोदरच काढले असते तर ही दुर्घटना टळली असती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *