दौंड
दिनांक १२ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामपंचायत मासिक मिटिंगमध्ये यवत गावचे उपसरपंच सुभाष यादव यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा सुपूर्द केला, ज्यामध्ये सूचक अनुमोदक ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शेंडगे व गौरव दोरगे यांनी सह्या केल्या यावेळी उपसरपंच पदाचा राजीनामा सुभाष यादव यांनी ग्रामपंचायत सदस्य नाथ देव दोरगे यांच्याकडे देण्याचा प्रयत्न केला.
परंतु प्रोटोकॉल प्रमाणे राजीनामा सरपंचाच्या हातात देणे बंधनकारक असल्याचे सांगत नाथदेव दोरगे यांचे सांगण्यावर सुभाष यादव यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा सरपंच समीर दोरगे यांचेकडे दिला असल्याचे सदस्य नाथदेव दोरगे यांनी सांगितले, उपसरपंच सुभाष यादव यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिलेबाबत अनेक वृत्तपत्रांमध्ये बातम्या आल्या ज्यामध्ये सुभाष यादव यांनी त्यांची बाजू मांडताना असे सांगितले की माझ्या एकट्याचाच राजीनामा न घेता सरपंचाचा देखील राजीनामा घ्यावा अशी मागणी करत राजीनामा दिला असल्याचे जणू कबूल केले होते.
काल दिनांक १७ जानेवारीला अचानक उपसरपंच सुभाष यादव यांनी ग्रामपंचायत येथे तो राजीनामा माझा नाही असे लेखी तक्रार केली आहे याबाबत ग्रामविकास अधिकारी राजाराम शेंडगे यांनी सांगितले की,सुभाष यादव यांचा उपसरपंचपदाचा राजीनामा मंजूर करणे प्रक्रियेसाठी सरपंच समीर दोरगे यांनी दिनांक १२ जानेवारीला माझ्याकडे वर्ग केला आहे परंतु पुन्हा १७ जानेवारीला सुभाष यादव यांनी राजीनामा माझा नसल्याची लेखी तक्रार केली आहे असे सांगितले.
याबाबत सरपंच समीर दोरगे यांना विचारले असता सुभाष यादव यांचा १२जानेवारी ला मासिक मिटिंग मध्ये उपसरपंचपदाचा राजीनामा आलेला असून आता पुन्हा १७ जानेवारला तो राजीनामा माझा नाही असा देखील अर्ज आला आहे दोन्ही राजीनामा व तक्रार अर्जाबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन मागवणार असून कायदेशीर मार्गाने पुढील प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे सांगितले.
माझ्या राजीनाम्याचे पत्र कोणीही देऊ शकत: सुभाष यादव
यावर संजीवनी न्युजने सुभाष यादव यांच्याशी संपर्क साधला असता माझ्या राजीनाम्याचे पत्र कोणीही देऊ शकत अस सुभाष यादव यांनी सांगीतले.
१७ जानेवारी रोजी आलेल्या त्या अर्जाबाबत नाथदेव दोरगे यांना विचारले असता उपसरपंच सुभाष यादव यांनी राजीनामा स्वइच्छेने सर्व सदस्य समक्ष दिनांक १२ जानेवारी रोजी मासिक मिटिंग मध्ये दिला आहे आता पुन्हा सुभाष यादव जर राजीनामा दिला नाही असं म्हणत असतील तर ते खोटे बोलत आहेत, याबाबत पक्षश्रेष्ठींशी बोलणार आहे आणि पक्षश्रेष्ठी त्यावर निर्णय घेतील असे सांगितले.
राजीनाम्यावरील सूचक अनुमोदक राजेंद्र शेंडगे व गौरव दोरगे यांनी उपसरपंच सुभाष यादव यांच्या “तो राजीनामा माझा नाही” या तक्रार अर्जावर आश्चर्य व्यक्त केले आहे.
यावेळी यवत गावचे नागरिक उत्तम गायकवाड यांनी खरं कोण खोट कोण आम्हाला सगळं कळत काहींना पोपटासारखे शिकवून पाठवले जाते परंतु त्यांचाच पोपट होतो असे बोलत नाव न घेता टीका केली व सर्वसामान्य जनतेच्या मतदानावर निवडून आलेल्या सदस्यांच्या मतावर निवडून आलेल्या सरपंच व उपसरपंच यांनी काहीही निर्णय घेताना समाजाचा विश्वासघात करू नये व राजकारणावरील विश्वास उडेल असे करू नये असे सांगितले.
नक्की १२ तारखेला दिलेला राजीनामा खोटा होता तर मग प्रसारमाध्यमाना प्रतिक्रिया कशी दिली आणि १७ जानेवारीला केलेल्या अर्जाबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी उपसरपंच सुभाष यादव यांना संपर्क केला असता त्यांनी फोन उचलले नाहीत त्यामुळे नक्की गौडबंगाल आहे तरी काय ? “राजीनामा” खरा की “राजीनामा माझा नाही” हा अर्ज खरा हा विषय गुलदस्त्यात आहे आणि वरिष्ठ नेते यावर काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.