मुंबई
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्यावरही अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाई सुरू केली आहे. ईडी शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांची पत्नी वर्षा राऊत यांची समोरासमोर चौकशी करू शकते.
ईडीला संजय राऊत यांच्या घरातून काही कागदपत्रे मिळाली आहेत. या कागदपत्रांच्या आधारे ईडी राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांची चौकशी करू शकते. यानंतर आज सामना मध्ये संजय राऊत यांच ‘रोखठोक’ हे सदर आले आहे. यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.
संजय राऊत यांना अटक केलीये.अटक आरोपीला लेख लिहिण्याची परवानगी कशी? तुम्ही लोकमान्य टिळक, सावरकर आहात का? की तुम्हाला लेख लिहीण्याची परवानगी दिलीये. तुम्ही काही स्वातंत्र्य सैनिक नाही. तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. नसेल तर हे लेख कुणी लिहिले? जेलमध्ये बसून पब्लिसीटी घेण्याचा हा प्रकार आहे का?, असा सवाल त्यांनी केला. गैर काय म्हणजे? जेलमधून त्यांना लेख लिहीण्याची ईडीने परवानगी दिलीये का? ईडीने स्पष्ट करावं, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, यावेळी देशपांडे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून सरकारवर निशाणा साधलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा. लोकांची सहनशक्ती संपत चालली आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.राज्यात मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही. लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
उदय सामंत यांनी सांगितलं की सीईटी आणि इयत्ता बारावीचे मार्क वैद्यकीय प्रवेशासाठी गृहित धरले जातील. सामंत यांनी हे सांगितलं. पण हा प्रश्न अजून प्रलंबित आहे. त्यामुळे सरकारने त्यावरही निर्णय घ्यावा. राज्यात मंत्रीच नसल्याने जनता लटकली आहे, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.