तर भिडे गुरुजींच्या धोतरात साप सोडल्याशिवय राहणार नाही….

तर भिडे गुरुजींच्या धोतरात साप सोडल्याशिवय राहणार नाही….

पुणे

सतत वादग्रस्त विधान करून दोन समाजात ते निर्माण करणे आणि राष्ट्राचा अपमान करणारी वक्तव्य करून देशद्रोह करणाऱ्या भिडे गुरुजी यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावे, या मागणी साठी प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी संघटना सोलापूरच्या वतीने भिडे गुरुजी यांची प्रतिमा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी भिडे गुरुजी यांचा समाचार घेत त्यांचेवर जोरदार प्रहार केलं, जर भिडे गुरुजींनी 15 ऑगस्ट रोजी भारताचा तिरंगा फडकवला नाही तर भिडे गुरुजींच्या धोतरात साप सोडल्याशिवय राहणार नाही असा इशारा या प्रसंगी दिला.

भिडे गुरुजींवर गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावा आणि भिडे गुरुजी यांनी तातडीने मेडिकल तपासणी करून घेण्याचा सल्ला जिल्हा संपर्कप्रमुख जमीर शेख यांनी या प्रसंगी दिलं.

या वेळी जिल्हा प्रमुख दत्ता मस्के पाटील , शहर प्रमुख अजित कुलकर्णी, कार्यकारी प्रमुख खालिद मणियार, जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख, तालुका प्रमुख निरंजन ख्याडे, रुग्णसेवक रमेश कुंभार, तायप्पा कोळी, बबलू शेख, प्रकाश वाघमारे यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. या प्रसंगी भिडे गुरुजी याचे निषेधार्थ प्रहारच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *