दौंड: संसद रत्न खासदार सौ सुप्रिया ताई सुळे यांनी मागील आठवड्यात दौंड रेल्वे स्टेशन या ठिकाणी सुरू असलेल्या विविधविकास कामांची पाहणी केली होती कुरकुंभ मोरी चे काम फार दिवसापासून रेंगाळले आहे हे काम तातडीने व्हावे यासाठीयेथील नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी खासदार सौ सुप्रिया ताई सुळे यांच्याकडे मागणी केली. ताईंनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना हे काम तातडीने पूर्ण करावे अशा सूचना दिल्या यासंदर्भात आज सोलापूर डिव्हिजनचे डिव्हिजनल रेल्वेमनेजर श्री शैलेश गुप्ता यांच्याकडे मीटिंग आयोजित करून हे काम डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना केल्यातसेच या कामाचा आढावा घेण्यासाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे कुरकुंभ मोरी चे कामअत्यंत जलद गतीने पूर्ण करण्यासाठी चे निवेदन डिवीजनल रेल्वे मनेजर सोलापुर यांना देण्यात आले यावेळी बारामतीलोकसभा मतदारसंघाचे समन्वयक श्री प्रवीण शिंदे पुणे जिल्हा राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष श्री सोहेलखान दौंड शहर अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी गुरुमुख नारंग राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस दौंड शहर अध्यक्ष प्रशांत धनवेउपस्थित होते
