ग्रामीण संस्थेच्या माध्यमातुन दिव्यांग बांधवांची दिवाळी झाली गोड

ग्रामीण संस्थेच्या माध्यमातुन दिव्यांग बांधवांची दिवाळी झाली गोड

पुरंदर

ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून दिवाळी भाऊबीज निमित्ताने पुरंदर हवेलीचे कार्यक्षम आमदार मा.श्री. संजयजी चंदूकाका जगताप यांच्या शुभहस्ते आज पाच दिव्यांगाना प्रत्येकी एक लाख पाच हजार रुपये ची गाडी दिव्यांग बंधू भगिनींना वाटप करण्यात आले.

यावेळी भाऊबीज निमित्त औक्षण करून आमदार साहेबांचा सत्कार करताना त्यांनी ग्रामीण संस्थेचे आभार व्यक्त केले. सामाजिक बांधिलकेच्या भावनेतून ग्रामीण संस्थेने केलेले हे कार्य आगळेवेगळे आहे. याक्षणी दिव्यांग बंधु भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून दिवाळी सण साजरा केल्याचे एक वेगळे समाधान प्राप्त झाल्याची भावना आमदार संजयजी जगताप यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमाचे आयोजन प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या राज्य महिला अध्यक्ष सुरेखा ढवळे यांनी केले होते.

यावेळी प्रहारचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव नगराध्यक्ष मार्तंड भोंडे उपनगराध्यक्ष पुष्पा काकीजगताप ताई, नगरसेवकअजित जगताप विजय नाना वढणे, संदीप राऊत,हेमंत टकले,मनोहर जगताप, सुहास लांडगे,सागर जगताप, संजय गांधी समिती सदस्य संभाजी महामुनी,संदिप जगताप,पूनम जगताप, दत्तात्रय दगडे,यशवंत शिंदे आधी दिव्यांग बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी (सासवड ) शकील सिकंदर बागवान (कोथळे)सागर अनिल जगताप (निरा) रेखा ज्ञानेश्वर धुमाळ,(मांडकी) शिवाजी रघुनाथ शिंदे (कोंडीत) मिना लोहकरे यांना गाडी देण्यात आली.

सदर उपक्रमाबद्दल मा.सौ राजवर्धिनीताई संजयजी जगताप (संस्थापिका /अध्यक्षा : ग्रामीण संस्था ) व ग्रामीण संस्थेच्या सर्व टीमचे मनापासून आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *