ग्रामपंचायत निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी बाळांतिण ॲम्बुलन्समधून चक्क तहसील कार्यालयात दाखल;शेवटच्या दिवशी “या” गावच्या सरपंच पदाच्या उमेदवारीचा अर्ज भरला

ग्रामपंचायत निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी बाळांतिण ॲम्बुलन्समधून चक्क तहसील कार्यालयात दाखल;शेवटच्या दिवशी “या” गावच्या सरपंच पदाच्या उमेदवारीचा अर्ज भरला

बीड

सध्या बीड ग्रामपंचायत निवडणूकांची जय्यत तयारी सुरू आहे. अशात उमेदवारी अर्ज निघाल्यापासून अनेक ठिकाणी मजेशीर घटनाही घडल्या आहेत. अशात आज अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याने अनेक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. बीड जिल्ह्यातील परळ येथे अर्ज करण्यासाठी आलेल्या एका महिलेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

कारण ही महिला चक्क ॲम्बुलन्समधून सरपंच पदाच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी आली होती.मिळालेल्या माहितीनुसार, परळीतील वानटाकळी गावातून सरपंच पदासाठी इच्छूक असलेल्या सौ. पल्लवी माने या तहसील कार्यालात ॲम्बुलन्समधून पोहचल्या. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एका नवजात बाळाला जन्म दिला. दरम्यान या काळात त्यांना निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास वेळ मिळाला नाही.

तसेच आज शेवटची तारीख असल्यने काही करून त्यांना अर्ज भरणे गरजेचे होते.त्यामुळे पल्लवी त्यांचे पती आणि काही कार्यकर्त्यांबरोबर ॲम्बुलन्समधून आल्या. त्यांनी नवजात बाळाला देखील तहसीस कार्यालयात आणले होते. आज ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी शेवटची दिनांक असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *