खळबळजनक !!!!!!  बायकोचा गळा आवळला, अल्पवयीन मुलीला दगडाने ठेचलं

खळबळजनक !!!!!! बायकोचा गळा आवळला, अल्पवयीन मुलीला दगडाने ठेचलं

नागपूर

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर परिसरात दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेची गळा आवळून, तर 10 वर्षीय मुलीची दगडाने ठेचून हत्या करुन आरोपी फरार झाला आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.

कळमेश्वर परिसरातील झुणकी मार्गावर श्रावण घोडपागे यांचं शेत आहे. त्यांनी ते शेत भाड्याने दिलं आहे. ज्यांना शेत देण्यात आलं आहे, त्यांनी शेतात काम करण्यासाठी मध्य प्रदेशमधील एका कुटुंबाला नोकरीसाठी ठेवलं होतं. राकेश साहू हा पत्नी आणि 10 वर्षीय मुलीसोबत शेतातच झोपडी टाकून राहत होता.

पती-पत्नीमध्ये काहीतरी वाद झाला आणि त्याने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचा संशय आहे. पत्नीसोबतच 10 वर्षीय मुलीचाही त्याने दगडाने ठेचून हत्या केल्याचा आरोप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *