कितीही डायलॉग बाजी केली तर तुम्हांला कॅबिनेट सोडा साधं राज्यमंत्री हे पद देखील भेटणार नाही ; तुम्ही “करमणुकीचे पात्र” आहे,शिंदे गटाचे “जॉनी लिव्हर”…

कितीही डायलॉग बाजी केली तर तुम्हांला कॅबिनेट सोडा साधं राज्यमंत्री हे पद देखील भेटणार नाही ; तुम्ही “करमणुकीचे पात्र” आहे,शिंदे गटाचे “जॉनी लिव्हर”…

अकोला

सध्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये शहाजी पाटील हे करमणुकीचं पात्र आहे. ते शिंदे गटाचे जॉनी लिव्हर असून या पलीकडे त्यांची कुठलीही प्रतिमा महाराष्ट्रात नाही असा टोला आमदार मिटकरी यांनी शहाजी पाटील यांना लगावला आहे. मिटकरी हे अकोला येथे बोलत होते.

आमदार शहाजी पाटील यांनी अमोल मिटकरी यांचा संजय राऊत होणार असं वक्तव्य नुकतेच केले होते. अमोल मिटकरींनी आमदार शहाजी पाटलांच्या वक्तव्यास प्रत्युत्तर देत ते सध्याच्या सरकारममधील करमणुकीचं पात्र आहे असे म्हटलं आहे.अमोल मिटकरी म्हणाले शिंदे गटाचे ते जॉनी लिव्हर असून या पलीकडे त्यांची कुठलीही प्रतिमा महाराष्ट्रात नाही. त्यांच्या मतदारसंघात शून्य विकास आहे. ‘माझी’ काळजी न घेता, शिंदे गटात त्यांची कशी पायखेचनी सुरु आहे.

याची काळजी घ्यावी असंही मिटकरींनी नमूद केले.मिटकरी म्हणाले शिंदे गटात कितीही डायलॉग बाजी केली तर तुम्हांला कॅबिनेट सोडा साधं राज्यमंत्री हे पद देखील भेटणार नाही. त्यांची ही शेवटीचं टर्म राहील असेही मिटकरींनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *