जळगाव
पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत निधीतून गटार व ढापे बांधण्याचे काम पूर्ण केल्यानंतर कामाचे बील अदा करण्यासाठी चोपडा हद्दीतील वर्डी गावातील ग्रामविकास अधिकाऱ्याने १२ हजार ५०० रुपयांची लाच मागितली होती.सोमवारी तडजोडी अंतर्गत ११ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने भगवान पांडुरंग यहीदे यांना रंगेहाथ अटक केली.
तक्रारदार हे सब कॉन्ट्रॅक्टर असुन , पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत निधीतून गटार व ढापे बांधण्याचे काम पुर्ण केले असुन सदर कामाचे बिल अदा होणेकामी आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांनी केलेल्या कामाचे बिल अदाकरणे कामी पंच साक्षीदारांसमक्ष 12500/- रुपयांची मागणी करून तडजोडीअंती 11,000/- रु स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्वीकारले. सापळा कार्यवाही दरम्यान आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सुनिल कडासने . पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र. नारायण न्याहळदे . अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र. सतीश भामरे वाचक,पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि नाशिक परीक्षेत्र. यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पर्यवेक्षण अधिकारी अनिल बडगुजर पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि.धुळे यांनी राजन कदम,शरद काटके,संतोष पावरा,मोरे , सुधीर मोरे. या पथकासह कारवाई केली
👍👍👍