उद्या होणार कॉंग्रेसतर्फे बोंबाबोंब आंदोलन

उद्या होणार कॉंग्रेसतर्फे बोंबाबोंब आंदोलन

सासवड

केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल,डिझेल आणि घरगुती गँस यांच्या दरवाढीचा तसेच खाद्यतेले यांचे वाढलेले बाजारभाव यामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणार्या त्रासाच्या विरोधात पुरंदर तालुका कॉंग्रेस कमीटीच्या वतीने सासवड येथे बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे.

अनेक घटकातील वाढलेली महागाई यामुळे पुरंदर-हवेलीच्या जनतेच्या वतीने महागाई वाढवणार्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी सायकल रँली तसेच बोंबाबोंब आंदोलन पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार व पुणे जिल्हा कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष संजय जगताप यांच्या उपस्थितित सोमवारी सकाळी १० वाजता शिवतीर्थ चौक सासवड याठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *