उद्या सासवडला होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भव्य सभा; शहाजी बापूंच्या भाषणाकडे राहणार लक्ष !!!!!

उद्या सासवडला होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भव्य सभा; शहाजी बापूंच्या भाषणाकडे राहणार लक्ष !!!!!

पुरंदर

नाट्यमयरित्या राज्यात झालेल्या सता परिवर्तनानंतर मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांची पश्चिम महाराष्ट्रातली पहिली सभा मंगळवारी (दि ०२ ऑगस्ट) पुरंदर तालुक्यातील सासवड येथे होणार आहे. पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुंजवणी प्रकल्प, फुरसुंगी उरुळी पाणी योजना, हवेलीतील गावांचा अवाजवी टॅक्स आणि दिवे येथील राष्ट्रीय बाजार अशा विविध मुद्द्यांची या सभेत तड लागणार असल्याचे बोलले जाते. सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ गुलाबराव पाटील, गुवाहाटी फेम आमदार शहाजीबापू पाटील, खासदार श्रीरंग बारणे, मा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असे दिग्गज उपस्थित राहणार आहेत असेही शिवतारे म्हणाले.

राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली. त्यानंतर त्यांच्या पाठीशी माजी आमदारांपैकी सर्वात प्रथम कोण उभे राहिले असेल तर ते म्हणजे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे. शिवतारे आणि शिंदे यांचे सख्य असल्याने उठावानंतर मध्यस्थी करण्याची तयारीही शिवतारे यांनी दर्शवली होती. दरम्यान मंगळवारी होणारी सभा ही मोठ्या पालखीतळ मैदानावर होणार आहे. या मैदानावर अनेक वर्षांनी सभा होत आहे. मधल्या काळात सासवड पालिकेने हे मैदान सभांसाठी द्यायला बंद केले होते. उद्धव ठाकरे यांची भव्य सभा याच मैदानावर झाली होती.

शहाजी बापूंच्या भाषणाकडे राहणार लक्ष
झाडी, डोंगार आणि हॉटेल डायलॉग फेम शहाजी बापू पाटील यांचं भाषण ऐकायला पुरंदर हवेलीत मोठी उत्सुकता दिसून येत आहे. सेनेची मुलुख मैदानी तोफ गुलाबराव पाटील हेदेखील उद्या मैदान गाजवणार अशी चर्चा तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मा. राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *