आम्हाला न्याय देणार्या नेत्याची गरज भासत आहे – भांडवलकर कुटुंबीय

आम्हाला न्याय देणार्या नेत्याची गरज भासत आहे – भांडवलकर कुटुंबीय

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील सासवड येथे नगरपालिकेच्या पुढे भांडवलकर कुटुंबाचे न्याय हक्कासाठी चालु असलेल्या चक्री उपोषणाला जवळपास एक महिना होत आला आहे.आम्हाला न्याय देणारा माणुस किंवा एकही नेता पुढे येत नाही,त्यामुळे आम्हाला न्याय मिळवुन देणार्या नेत्याची गरज भासत असल्याची प्रतिक्रिया भांडवलकर कुटुंबीयांनी दिली आहे.

याठिकाणी चालु असलेल्या चक्री उपोषणाला सुनिल आसवलीकर यांनी जाहिर पाठिंबा दिला आहे.

सदरची जमीन ही कै.दगडु शंकर भांडवलकर यांच्या स्वमालकीची होती परंतु सदर जमीन ही नगरपालिकेने व शासनाने बाग करण्यासाठी घेतली होती.परंतु आता शासनाचा उद्देश बदललेला दिसत आहे.व आता त्याठिकाणी गाळे,टपर्या व भाजी मंडई सुरु करण्यात आली आहे.

सदर जागा परत मिळविण्यासाठी भांडवलकर कुटुंबीय हे सध्या चक्री उपाषण करीत असुन त्यांना न्याय देणारा एकतरी नेता आता शिल्लक आहे का? असा प्रश्न पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *