पुरंदर
पुरंदर तालुक्यासाठी वरदान ठरलेली पुरंदर उपसा जलसिंचन योजना.पण या योजनेला चोरट्यांची लागलेली घर-घर चिंतेचा विषय ठरत असताना दिसतोय.
आजच पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पुरंदर उपसा लाभक्षेत्रातील सर्व शेतकर्यांचे म्हणने मांडण्यासाठी सभेचे आयोजन केले होते.
या सभेत बर्याचशा शेतकर्यांनी पाण्याची होणारी चोरी हाच विषय मांडला परंतु मिटींगनंतर लगेचच एअर वॉल्व वर पोत किंवा गोधडी टाकुन पाणी चोरुन घेताना दिसतय.हे पाणी चोरुन आहे का रितसर आहे हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
यासंदर्भात पुरंदर उपसा सिंचन योजनेचे अधिकारी लगड यांना विचारले असता आम्हाला या गोष्टी माहितच नाहीत म्हणुन त्यांनी हात वर केले आहेत.
या योजनेवर नक्कीच कोणाचा वचक आहे का हे पाहणे महत्वाच असुन जे शेतकरी रीतसर पैसे भरुन पाणी घेतात त्यांना न्याय मिळेल का हाच प्रश्न शेतकर्यांच्या मनात पडला आहे.