सासवड: पदवीधर व शिक्षक मतदार संघ पुणे विभागाची निवडणूक 2020 साली झाली.यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर व अरुण लाड उमेदवार म्हणून उभे होते.त्यावेळी त्यांच्या प्रचारार्थ निवडणूक मेळाव्याचे आयोजन सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहात केलेले होते.यावेळी महाविकास आघाडीचे वरिष्ठ पातळीवरिल बहुतांशी पदाधिकारी उपस्थित होते.या मेळाव्यातील राजकीय व्यासपीठावर भिवडी केंद्राचे केंद्र प्रमुख राजेंद्र महादेव जगताप यांनी भाषण करून महाविकास आघाडी ला मते देण्याचे आवाहन केले.कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला आचार संहितेच्या कालखंडात राजकीय व्यासपीठावर जाण्यास मज्जाव असतो,तरीदेखील यांनी तो नियम मोडीत काढत भाषण ठोकले, त्यामुळे आदर्श आचार संहितेचा भंग झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी पुणे यांचे कडे रिपब्लिकन पक्षाचे पुरंदर तालुकाध्यक्ष पंकज धिवार यांनी केलेली होती.
या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे उप विभागीय अधिकारी दौड-पुरंदर यांचे कार्यालया समोर तीन दिवसीय उपोषण केले होते,त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी लेखी आश्वासना द्वारे उपोषण थांबविण्याची विनंती केली होती.त्यामध्ये दोषींवर कारवाई चे आश्वासन दिले होते.परंतु एक वर्ष होऊन देखील जिल्हाधिकारी यांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे दि.2 ऑगस्ट 2021रोजी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन दि. 11 ऑगस्ट पासून त्यांचे कार्यालया समोर आर पी आय चे तालुकाध्यक्ष पंकज धिवार,युवाध्यक्ष स्वप्नील कांबळे व सासवड शहर युवती अध्यक्षा मयुरी रिठे यांचेसह उपोषणास बसलेले आहेत.
कोविड 19 च्या प्रदूर्भावा मुळे मर्यादित कार्यकर्त्यां समवेत उपोषणास बसल्याचे धिवार यांनी सांगितले. त्याचवेळी ते असेही म्हणले की जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण हे सुरूच राहणार.
तसेच केंद्र प्रमुख राजेंद्र जगताप आपल्या इतर केंद्रप्रमुख सहकारी यांसमवेत , ते सहाययक निबंधक कार्यालया समोर आंदोलन केले होते.त्यावेळी सहाययक निबंधक अधिकारी यांनी त्यांना तसे न करण्या बाबत लेखी पत्र देऊन देखील त्यांनी सदरचे आंदोलन केले. जिल्हाधिकारी यांचे आपत्ती व्यवस्थापन च्या आदेशाचे उल्लंणघन केलेले असल्यामुळे त्यांचे वर कारवाई करावी अशीही मागणी केलेली आहे.यावेळी पश्चिम महाराष्ट्र युवा कार्याध्यक्ष नीलेश आल्हाट,पुणे जिल्हा युवती अध्यक्ष सौ.सुप्रिया वाघमारे-माने, हवेली तालुकाध्यक्ष मारुती कांबळे,गोविंद साठे यांनी ज़ाहिर पाठीम्बा दिला.