सासवड
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे सासवड नगरपालिकेसमोर भांडवलकर कुटुंबीयांचे सुरु असलेल्या चक्री उपोषणाला एक महिना पुर्ण झाला आहे तरीदेखील आजतागायत या उपोषणाची कोणीही दखल घेतल्याचे दिसुन येत नाही.
स्वत:ची जागा परत मिळवण्यासाठी उपोषण करावे लागते व एक महिना उपोषण करुन कोणीही दखल घेत नाही ही खुप खेदजनक बाब आहे.
सदरची जागामुळ मालक कै.दगडु शंकर भांडवलकर यांच्या वारसांना परत मागण्याचा अधिकार व हक्क आहे.
सन १९९९ ते २००४ साली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी सदस्य व कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते व दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निकटवर्ती सुनिल आसवलीकर यांनी यामध्ये पुढाकार घेतला व महाराष्ट्र राज्य क्रिडा परिषद सदस्य अरविंद रणपिसे यांनी मिळुन भांडवलकर कुटुंबीय व विलासराव देशमुख यांची भेट घडवुन आणली.
सन १९९९ ते २००४ दरम्याण त्यावेळी असणारे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी याप्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी संबंधित भांडवलकर कुटुंबियांना मुंबईत बोलावुन घेतले होते.
भांडवलकर कुटुंबीचे सदस्य असणारे तुकाराम भांडवलकर यांच्याबरोबर रामोशी समाजातील काही नेते मंडळी भेटायला गेले होते.
त्यावेळी विलासराव देशमुख यांनी सर्व कागदपत्रांची पडताळणी करुन त्यावेळचे पुणे जिल्हाधिकारी मधुकर कोकाटे यांना सुचना दिल्या व न्याय देण्यास सांगीतले.या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा असे आदेश दिले होते.
अशा न्याय देणार्या लोकनेत्याची म्हणजेच दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज आम्हाला आठवण येतेय असे भांडवलकर कुटुंबीयांनी सांगीतले.