पुरंदर:
पुरंदर तालुक्याच्या पुर्वेस असणार्या आंबळे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत दुरावस्थेत होती ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे श्रीमती विजया दरेकर मेमोरियल हॉस्पिटल ची इमारत नाममात्र भाडे तत्वावर मिळवण्यात ग्रामपंचायतीला यश आले त्यामुळे सुसज्ज अशी इमारत आरोग्य विभागाला लाभली आणि थोड्याच कालावधीमध्ये पुरंदर-हवेली चे लोकप्रिय आमदार श्री संजय जी जगताप यांच्या विशेष प्रयत्नाने पुरंदर तालुका गट विकास अधिकारी श्री अमर माने तालुका आरोग्य अधिकारी सौ उज्वला जाधव डॉक्टर विवेक आबनावे तसेच ग्रामपंचायतीने वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे दिनांक 25 रोजी आंबळे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली यामुळे लोकांना होणारा प्रवासाचा नाहक त्रास वाचून गावातच लसीची सोय उपलब्ध करून देण्यात आली

आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील १४० नागरीकांनी लस घेतलेली आहे.या अगोदर गावातील नागरिकांना माळशिरस याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागत होते. परंतु गावातच लसीकरण सुरु झाल्याने सर्व नागरिकांच्यात आनंदाचे वातावरणातयार झाले आहे आतापर्यंत जवळपासयावेळी सरपंच सौ राजश्री थोरात उपसरपंच सचिन दरेकर माजी सरपंच शशिकांत भाऊ दरेकर माजी उपसरपंच अण्णासाहेब दरेकर माजी उपसरपंच नामदेव थोरात ग्रामसेवक गोरोबा वडवले तसेच ज्यांनी लस मिळवण्यासाठी अधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला ते सामाजिक कार्यकर्ते दिलीप जगताप आरोग्यसेविका यादव मॅडम आरोग्य सेवक भापकर डॉक्टर तसेच डॉक्टर सूर्यवंशी व मदतनीस थोरात व मोठ्या संख्येने 18 ते 44 वयोगटातील लाभार्थी उपस्थित होते या वेळी अनेक तरुणांनी गावात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सेंटर उपलब्ध झाल्यामुळे ग्रामस्थांची चांगली सोय झाली आहे त्यासाठी सर्व नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यां चे आभार मानले.