आंबळे गावठाण ते ढवळेश्वर रस्ता का रखडला? याला आश्रय कोणाचा? दोन वेळा कशी काय मिळाली मुदतवाढ ; ग्रामस्थांचा सवाल

आंबळे गावठाण ते ढवळेश्वर रस्ता का रखडला? याला आश्रय कोणाचा? दोन वेळा कशी काय मिळाली मुदतवाढ ; ग्रामस्थांचा सवाल

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील आंबळे या ठिकाणी असणार्या आंबळे गावठाण ते ढवळेश्वर मंदिर रस्ता हा गेल्या दोन वर्षापासुन रखडलेला असल्याचे पहावयास मिळत आहे.

सदर रस्त्याचा काम सुरु करण्याचा दिनांक हा ०५/०९/२०१९ होता व काम पुर्ण करण्याचा दिनांक ०४/०३/२०१९ होता परंतु आजतागायत रस्ता पुर्णत्वास गेलाच नाही.

त्यानंतर या रस्त्याच्या कामासाठी मुदतवाढ मिळाली व ०४/०७/२०२२ पर्यंत मुदतवाढ मिळाली त्या मुदतीतही या रस्त्याचे काम पुर्ण झाले नाही व या रस्त्यासाठी ३१/०३/२३ अशी मुदतवाढ देण्यात आली आहे.

आंबळे ते रामवाडी रस्त्याचे कारपेट डांबरीकरण चे काम पावसाळ्यानंतर पूर्ण होईल.
पी. ए. पवार
शाखा अभियंता

या मुदतवाढीत नेमकी भुमिका कोणाची आहे व ही मुदतवाढ दोन वेळा का व कशी मिळाली हाच महत्वाचा प्रश्न आंबळे गावातील नागरिक विचारत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *