आंबळेतील विद्यार्थ्यांची युक्रेनवरून सुखरूप घरवापसी !!!!!        आई वडिलांचे आनंदाश्रु अनावर.

आंबळेतील विद्यार्थ्यांची युक्रेनवरून सुखरूप घरवापसी !!!!! आई वडिलांचे आनंदाश्रु अनावर.

पुरंदर

रशिया व युक्रेन मध्ये गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या युद्धामुळे भारतातील अनेक विद्यार्थी अडकून पडले होते.वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेला आंबळे(ता. पुरंदर)येथील विद्यार्थी अनेक अडचणींचा सामना करीत नुकताच आपल्या घरी सुखरूप परतला.यामुळे विद्यार्थ्याच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे अश्रू अनावर झाले होते.

आंबळे(तालुका पुरंदर)येथील प्रगतशील शेतकरी गुलाब दरेकर यांचा मुलगा केतन दरेकर हा युक्रेन येथे पाच वर्षापासून वैद्यकीय शिक्षण घेत आहे.गेल्या दहा दिवसांपासून रशिया व युक्रेन या देशांमध्ये तणाव निर्माण झाला.

तणावाचे पुढे युद्धात रूपांतर झाले.रशियाकडून तासातासाने होणारे हवाई व शस्त्र हल्ल्यामुळे केतनला तीन दिवस बंकर मध्ये काढावे लागले.या कालावधीत आलेल्या अडचणींचा पाढा त्याने संजीवनी न्युज समोर मांडला,तो म्हणाला की प्रत्येक एक दोन तासाने रशियन आर्मी बॉम्ब टाकून जात होती.त्यामुळे आम्हाला बंकर मध्ये राहावे लागले.मार्केट मध्ये गेल्यावर खाण्याचे पुरेसे साहित्य मिळत नव्हते.पिण्याचे पाणी तर मिळतच नव्हते.एटीएम मध्ये पैसे मिळत नव्हेत.

युध्यजण्य परिस्थितीतून आमचा मुलगा केतन घरी परतल्याने आम्हाला समाधान मिळाल्याचे वडील गुलाब दरेकर व आई शुभांगी दरेकर यांनी सांगितले.

तेथील विमानसेवा बंद असल्याने नऊशे ते हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या हंग्री,रोमानिया,पोलंड येथे जावे लागणार होते.मात्र वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे परतीचे सर्व मार्ग बंद होते.युध्यजन्य परिस्थितीमुळे विमान तिकीट देखील महागले होते.यामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या माझ्यासह सर्वच विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

भारत सरकारच्या प्रयत्नामुळे दिल्लीमध्ये ३ मार्च रोजी रात्री उशीर दिल्ली येथे पोहचलो.तेथून खाजगी विमानाने ४ मार्च रोजी पुणे येथून घरी पोहोचल्याचे केतन दरेकर यांनी सांगितले.घरी पोहोचल्यावर आई शुभांगी दरेकर,वडील गुलाब दरेकर व भाऊ चेतन दरेकर यांच्या डोळ्यावर आनंदाश्रू दाटून आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *