पुरंदर
जेजुरी ते मोरगाव दरम्यान मावडी हद्दीतील रस्ता अतिरिक्त डांबरामुळे गुळगुळीत झाला होता.त्यामुळे या ठिकाणी अनेक दुचाकी स्वारांसह कित्येक वाहन चालकांना देखील अपघातास सामोरे जावे लागत होते.मात्र वाहन चालकांची अडचण लक्षात घेता अजित युवा विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचा अक्षरशः कायापालट करण्यात आला आहे . पुरंदर तालुक्याच्या हद्दीवर तसेच बारामती तालुक्याला जोडणाऱ्या मावडी येथील जेजुरी मोरगाव रस्त्याच्या कामात अतिरिक्त डांबर वापरल्यामुळे मावडी ते जवळार्जुन फाट्या दरम्यानचा रस्ता अत्यंत गुळगुळीत झाला होता.त्यातच पाऊस सुरु झाल्यावर या वळणदार व गुळगुळीत रस्त्यावर भरदाव वेगाने जाणारी चारचाकी वाहने अचानक पलटी झाल्याच्या कित्येक घटना देखील घडू लागल्या होत्या. त्यातच या रस्त्यावर दुचाकी वाहने सुद्धा वारंवार घसरू लागल्याने अनेक दुचाकीस्वारांना दुखापतीस सामोरे जावे लागत होते.
वाहन चालकांची अडचण व नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊनच या ठिकाणी भविष्यातील अपघात रोखण्यासाठी अजित युवा विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांची भेट घेऊन सदरची बाब त्यांच्या लक्षात आणून दिली होती.त्यावर खासदार सुळे यांनी त्वरित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना देखील केल्याने या रस्त्याचे काम त्वरित सुरु करण्यात आले आहे.
यावेळी अजिंक्य टेकवडे यांच्या प्रयत्नांना यश आल्याने विकास भामे, अनिकेत गायकवाड, विकास चाचर, रामदास भामे, राजेंद्र जगताप, महेंद्र भामे, शांताराम जगताप, प्रकाश भामे, ओंकार टेकवडे, प्रशांत टेकवडे आदी मान्यवरांसह येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले .