अधिकारी वीज कनेक्शन कट करण्यासाठी शेतात आले तर त्यांना तिथेच झोडा

अधिकारी वीज कनेक्शन कट करण्यासाठी शेतात आले तर त्यांना तिथेच झोडा

पुणे

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी अमरावतीमधील शेतकऱ्यांना एक अजब सल्ला दिला आहे. वीज कनेक्शन तोडण्यासाठी अधिकारी आले तर त्यांना तिथेच झोडा असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही, तर शेतकऱ्यांच्या विजेला हात लावू नका असा सज्जड दमही यशोमती ठाकूर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पाणीटंचाइचा आढावा घेतला. यावेळी परिसरातील काही शेतकऱ्यांनी वीज कनेक्शन कट केल्याबाबतची तक्रार त्यांच्याकडे केली.

शेतकऱ्यांची तक्रार ऐकल्यानंतर यशोमती ठाकूर यांनी भर बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं.गेली दोन वर्ष कोरोना होता, लोकांनी काय आत्महत्या करायची का? तुम्ही शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कसे काय कट करत आहात? असा सवाल त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारला. शेतकऱ्यांची वीज कट करू नका, हे निर्दयी सरकार आहे, असं म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीका देखील केली.इतकंच नाही तर, अधिकारी वीज कनेक्शन कट करण्यासाठी शेतात आले तर त्यांना तिथेच झोडा, असा अजब सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.कृषी धोरणाच्या नावाखाली महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांकडून सक्तीने वीज बिल वसूली करण्याचे काम मागील ८ दिवसांपासून हाती घेण्यात आले आहे. थकबाकी न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सुरू असून, महावितरणच्या या मनमानी कारभारामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *