सोलापुर
अजित पवार हाय हाय….
तृतिय पंथियांनी वाजवल्या अजित पवारांचा नावाने टाळ्या
देऊळवाल्यांकडून कोरडा हासूड मारुन घेत तर तृतीय पंथीयांकडून टाळ्या वाजवत महाराष्ट्र सरकांरचा निषेध नोंदविण्यातआला.
अजित पवार हाय हाय म्हणत तृतिय पंथियांनी अकलूज-माळेवाङी व नातेपुते नागरीकांच्या उपोषणाला पाठिंबा देत अजित पवार व महाराष्ट्र शासनाचा आपल्या आनोख्या स्टाईलने टाळ्या वाजवून निषेध व्यक्त केला.
अकलूज-माळेवाङी व नातेपुते ग्रामपंचायती अनुक्रमे नगर परिषद व नगर पंचायत व्हावी. शासनाने अङवून ठेवलेली मंजूरीत्वरीत मिळावी याकरीता गत दहा दिवसांपासून सुरु असलेले आंदोलन आता उग्र स्वरुप धारण करत आहे. गोर-गरीबनागरीकांच्या विकासाआङ येणाऱ्या अजित पवारांना माळशिरस तालूक्यातील जनता कधीही माफ करणार नाही. येथुनपुढच्या निवङणुकांमध्ये याचे परीणाम दिसल्याशिवाय राहाणार नाहीत असे म्हणत तृतिय पंथियांनी जोरदार घोषणाबाजी केली.
एका बाजुला तृतिय पंथियांची घोषणाबाजी सुरु होती तर दुसऱ्या बाजुला देऊळवाला समाजातील नागरीक महाराष्ट्रशासनाचा निषेध करत अंगावर चाबकाचे फटके मारुन घेत होता. ङोक्यावर देऊळ घेऊन नाचताना शासनाने माळशिरसतालुक्याशी केलेल्या दुजाभावाचा धिक्कार करत होते.
यावेळी उपसरपंच शिवतेजसिंह मोहीते पाटील, गोरख चव्हाण, गंगुबाई निंबाळकर, श्रावण निंबाळकर, मच्छिन्द्र जाधव, बाबी चव्हाण, नंदाबाई निंबाळकर, सुगंधा जाधव, बाबा चव्हाण, लखन चव्हाण, तृतिय पंथिय भोपालमाई, परसुमाई, सनीमाई, सुनिलमाई, अण्णामाई, अक्षयमाई, तुषारमाई व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजच्या उपोषणात कृष्णा भीमा विकास आघाडीचे अध्यक्ष विश्वतेजसिंह रणजितसिंह मोहिते पाटील,ग्रां प सदस्य संजयसाठे माझी सरपंच विठ्ठल गायकवाड माझी उपसरपंच बाळासाहेब सणस दिपक खंडागळे कासिम तांबोळी सतिश व्होरायांदी उपस्थित होते.
अकलुज शहर सायकल दुकान मालक संघटना नवशक्ती नवराञ महोत्सव मंडळ योध्दा प्रतिष्ठान छावा ग्रुप महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ सयाजी राजे मिनी शाँपींग सेंटर पगडीचा राजा प्रतिष्ठान क्रांतीसिंह नगर.इंदिरा घरकुल यासंघटनांनी पठिंबा दिला आहे