अजित पवारांच्या प्रसिद्धीचा केंद्र सरकारने घेतला धसका : दिगंबर दुर्गाडे

अजित पवारांच्या प्रसिद्धीचा केंद्र सरकारने घेतला धसका : दिगंबर दुर्गाडे

पुरंदर

उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी सहा वाजल्यापासून महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी काम करीत असताना त्यांची काम करण्याची वेगळी पद्धत, तरुणांना आकर्षित करीत आहे.यामुळे अजित पवार यांना मिळत असलेल्या प्रसिद्धीचा धसका केंद्र सरकारने घेतला असून केवळ सुबुद्धीने जाणीपूर्वक त्यांना बदनाम करण्यासाठी आयकर विभागाने केलेली छापेमारी राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाइकांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकल्याच्या निषेधार्थ वाल्हे (ता. पुरंदर) येथे दुर्गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पवार यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. वाल्हे येथील महात्मा फुले स्मारकाला पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली. केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

यापूर्वीच्या काळात राजकारणामध्ये अनेक सरकारे आली गेली,मात्र कधीही अशी परिस्थिती पाहिली नव्हती. केंद्र सरकार त्यांच्याकडे असलेल्या एजन्सींचा आणि सत्तेचा वापर हा राजकीय कारणासाठी करत आहे. अजित पवार राष्ट्रवादीचे शक्‍तीस्थळ आहेत. ते शक्‍तीस्थळ उद्‌ध्वस्त करण्याचा प्रयत्न, भाजपच्या माध्यमातून केला जात आहे. या प्रकाराचा आम्ही निषेध करतो. अजित पवार यांचे नेतृत्व जपण्याचे काम आम्ही करू. अजित पवार यांचे कवचकुंड बनण्याचे काम येथून पुढे राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता करेल : प्रा. दिगंबर दुर्गाडे

यावेळी गावचे सरपंच अमोल खवले, माजी सरपंच दत्तात्रय पवार, पिसुर्टीचे माजी सरपंच अशोक बरकडे, माजी उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, सूर्यकांत पवार, माजी तंटामुक्‍ती अध्यक्ष सत्यवान सूर्यवंशी, राष्ट्रवादी सरचिटणीस निलेश शिंदे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष संदेश पवार, अनिल भुजबळ, अंकुश पवार, दीपक कुमठेकर, मोहम्मद इनामदार, संतोष गायकवाड, गोरक कदम, पवन दुर्गाडे, संतोष दुर्गाडे, महेंद्र भुजबळ, महेश पवार, विकास दुर्गाडे, विक्रम भुजबळ, प्रशांत भुजबळ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *