पुरंदर कोरोनाचा धोका,खबरदारी,उपाय व लसीकरण या बाबत सरपंच परिषदेचे प्रतिनिधी,सामाजिक संस्था व संघटनांचेप्रतिनिधीनी आयोजित केलेल्या ऑनलाईन कार्यशाळेला नागरिकांचा उस्पूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोना विरोधी जन अभियान पुणे आणि आंबेगाव,जुन्नर,पुरंदर,भोर,वेल्हे तालुक्याच्या सरपंच परिषदेचे प्रतिनिधी वस्थानिक संस्था,संघटनांचे प्रतिनिधी यांच्या वतीने नुकतीच कोविड विषयक ऑनलाईन कार्यशाळेला आरोग्य हक्कचळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते डॉ.अनंत फडके व रोग प्रतिकारशक्ती तज्ञ डॉ.विनिता बाळ यांनी मार्गदर्शन केले. मासूम संस्थेच्या जया नलगे यांनी प्रास्ताविक केले तर काजल जैन यांनी आभार प्रदर्शन केले. कोविड च्या तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी पूर्ण गावाचे लसीकरण वेगात करून घ्यावे,गाव पातळीवर विलगिकरणकक्ष गरजेनुसार येत्या काळात तातडीने सुरू करता यावेत यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा.खाजगी रुग्णालयातहोणाऱ्या कोविड साठीच्या खर्चावर नियंत्रण आणले जावे व त्यासाठी अंकेक्षण (ऑडिट) प्रक्रियेत सरपंच प्रतिनिधींनीसहभागी व्हावे इत्यादी मुद्द्यांवर कार्यशाळेच्या माध्यमातून चर्चा झाली. रचना संस्थेचे श्रीपाद कोंडे व मासूम संस्थेच्या काजल जैन यांनी सरपंच व उपसरपंचांच्या माध्यमातून कोविड साथ वलसीकरण विषयक समस्या निराकरणासाठी गावापासून ते तालुका पातळीपर्यंत पाठपुरावा करण्याचे आवाहन केले. किसान सभेचे अमोल वाघमारे यांनी आदिवासी भागात या कार्यशाळे साठी विशेष संपर्क साधला. उत्तम टाव्हरे,अशोकपेकारी,अशोक सरपाले,विजय गरुड,रेखाताई टापरें,विश्वनाथ निगळे व सरपंच परिषदेचे इतर सदस्य यांच्या सहकार्यानेहा उपक्रम राबविण्यात आला.
Maharashtra City: पुणे
फुकटच्या बिर्याणीनंतरही सुधारले नाहीत पोलीस! बारामतीत पोलीस हवालदाराला एक लाखाची लाच घेताना अटक!
बारामती कल्पना जाधव प्रतिनिधि बारामती दोन दिवसांपूर्वी पुण्यातील उपायुक्त महिलेला फुकटच्या बिर्याणीच्या प्रकरणावरून संपूर्ण राज्याने झोडले असताना देखील पोलीस सुधारायला तयार नाहीत. आज बारामतीत तब्बल एक लाख रुपयांची लाच घेताना पोलिसहवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. बारामती तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार दादासाहेब ठोंबरे याला 1 लाख 10 हजार रुपयांची लाच घेतानालाच पुणे लुचपत प्रतिबंधक विभागाने
टेकवडीच्या विकासासाठी भारत फोर्ज सज्ज : लीना देशपांडे.
माळशिरस पुरंदर ऑक्सिजन व्हिलेज टेकवडीसाठी युवकांनी पुढाकार घेतला आहे.संकल्पना नवीन आहे आणि या गावचे तरुण योग्य दिशेने वाटचाल करीत आहे याचा अभिमान वाटतो,तो उत्साह असाच कायम
नीरा येथे आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
पुरंदर पुरंदर तालुक्यातील निरा येथे आणाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीने आंनाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली आहे आज सकाळी दहा वाजता नीरा ग्रामपंचायत समोर अण्णाभाऊ
वाढदिवसाचा खर्च टाळुन पुरग्रस्तांसाठी २१००० रुपयांची मदत
बारामती प्रतिनिधि कल्पना जाधव शिवसेना बारामती महिला आघाडीच्या वतीने कोकण पुरग्रस्तांना सहकार्य करण्याकरिता उभारण्यात आलेल्या अभियानाचा शुभारंभ शिवसेनेच्या खडकवासला संघटक पुजाताई रावेतकर यांनी केला. पुजाताई
बेलसर येथे झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्या नंतर आता प्रशासनाकडून उपायोजनाना सुरुवात
पुरंदर पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिका विषाणू बाधित एक रुग्ण आढळून आल्यानंतर आता प्रशासनाच्या वतीने या विषयाला प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाय योजनांना सुरुवात करण्यात आली.
जेजुरीत लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
पुरंदर संपुर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे जेजुरीचे मार्तंड मल्हारी. या जेजुरी नगरीत लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंची जयंती मोठ्या ऊत्साहात साजरी करण्यात आली. जेजुरीच्या मल्हारी मार्तंडाच्या गडाच्या
पोंढे यवत जुन्या घाट रस्त्यासाठी युवकांचा पुढाकार.
आमदार राहुल कुल यांना निवेदन सादर. पुरंदर माळशिरस पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील टोकाचे गाव असलेल्या पोंढे येथून दौंड तालुक्यातील यवत येथे जाणाऱ्या जुन्या घाटरस्त्याचे काम झाल्यास पोंढे गावच्या सर्वांगीण विकासाला चालना
पिसुर्टी येथील ओढ्यात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई.दोघांना अटक सुमारे २१ लाखांचा मुद्देमाल जप्त.
नीरा पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी येथील ओढ्यात अवैधरित्या वाळू उपसा करणऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात नीरा पोलीसांना यश आलंय .पोलिसांनी आज दिनांक 31 जुलै रोजी रात्री अडीच वाजण्याच्या