विमानतळ व्हायला अजुन वेळ,तोपर्यंतच प्रपंचाचा झाला खेळ !!!!!

पुणे पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील प्रस्तावीत अंतरराष्ट्रीय विमानतळ अजुन कागदावरच आहे.स्थानिकांच्या विरोधामुळे अजुन तळ्यात मळ्यातच चालु आहे.त्यामुळे विमानतळाच्या प्रस्तावित ठिकाणाच्या परिसरात जमीनिंचे भाव वाढलेले आहेत.यातुनच

Read More

पोंढेतील अंगणवाडीत स्तनपान सप्ताह साजरा.

पुरंदर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्र पोंढे येथे स्तनपान सप्ताह व अन्न प्राशन दिनानिमित्त महिलांना स्तनपानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. डीलेवरी झाल्यानंतर अर्ध्या

Read More

जुन्नर अपहार प्रकरणी माजीसरपंच जयश्री मेहेत्रे व ग्रामसेवक राजेंद्र खराडे यांना न्यायालयीन कोठडी,येरवडाकारागृहात रवानगी

भ्रष्टाचारात अनेकांचे हात गुंतल्याचा संशय! जुन्नर   ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच जयश्री सुभाष मेहेत्रे आणिग्रामविकास अधिकारी राजेंद्र गेनभाऊ खराडे यांना देण्यात आलेली पोलिस कस्टडीची मुदत शुक्रवारी संपुष्टात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, जुन्नर न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, आरोपींचीरवानगी येरवडा कारागृहात करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान नारायणगाव ग्रामपंचायत मध्ये ३ ऑगस्ट २०२१ रोजी आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई केली असून तत्कालीनसरपंच जयश्री सुभाष मेहेत्रे (रा.नारायणवाडी ,नारायणगाव) व ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गेनभाऊ खराडे (रा.मंगरूळता.जुन्नर) यांना अटक करण्यात आली होती. या अपहार प्रकरणातील आणखी एक आरोपी महिला सरपंच ज्योति प्रवीणदिवटे यांची जामिन मिळवण्यासाठी धावाधाव सुरू आहे. तर यात अनेक जण सहभागी असल्याची शक्यता वर्तविण्यातयेत आहे. १ एप्रिल २०१५ ते १८  डिसेंबर २०१५ दरम्यान नारायणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री मेहेत्रे व ज्योति दिवटे याअनुक्रमे सरपंचपदी होत्या. तर याच कालावधीत ग्रामविकासअधिकारी राजेंद्र खराडे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. याकालावधीत ग्रामपंचायतीत रोखीने व्यवहार करणे, ई-टेडरिंग न करता खरेदी करणे आदी बेकायदेशीर व्यवहार करूनशासकीय निधीचा अपहार करून ५० लाख ८४ हजार ३४३ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचे ग्रामपंचायततपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी जुन्नर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी किसन बबन मोरे यांनी नारायणगावपोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या अपहार प्रकरणात अनेकजण अडकले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नारायणगाव ग्रामपंचायतीवरमाजी पंचायत समिती सदस्य चंद्रशेखर कोऱ्हाळे यांची सत्ता होती. सत्तेचा रिमोटकंट्रोल त्यांच्याच हाती होता. आणखीकिती प्यादे यात गुंतले आहेत. हे आता तापसंतीच स्पष्ट होईल !मात्र यात आणखी हात असण्याची शक्यता वर्तवली जातआहे.

Read More

वाजत गाजत फटाक्यांच्या आतषबाजीत गुंजवणीचे काम सुरु

पुरंदर माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे भगीरथ प्रयत्न अखेरीस फलद्रुप झाले. गुंजवणी प्रकल्पाच्या जलवाहिनीचे काम तोंडल ता. पुरंदर येथे आज सुरू करण्यात आले. ढोल ताशांच्या

Read More

मोकाट पाळीव डुकरांचे समूळ उच्चाटनासाठी निरेत होणार मुंडन आंदोलन.

निरा निरा शिवतक्रार गावात फिरणाऱ्या मोकाट पाळीव डुकरा मुळे मंदिरे,  मशिदी, स्मशानभूमी या ठिकाणी धार्मिक भावनादुखावणे. डुकरा मुळे होणारे अपघात,   निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न, शेतीचे नुकसान, दूषित होणारे पाणी आणिव्यापाऱ्यांचे होणारे नुकसान इत्यादी प्रश्न निर्माण होत असलेले लोकभावनेचा आदर करून मोकाट पाळीव डुकरांचे समूळउच्चाटन व्हावे या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघ व इतर सामाजिक संघटना गेले वर्षभरापासून उपोषणआंदोलनाद्वारे ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करीत आहे. स्वच्छ निरा, सुंदर निरा कागदावरच ब्रीद वाक्य असलेले ग्रामपंचायत निरा शिवतक्रार प्रशासन जनतेच्या आरोग्याचा प्रश्नहाताळण्यात अपयशी ठरलेले असून त्यांची मोकाट पाळीव डुकरांचा प्रश्न हाताळण्यात उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे गावात गंभीर आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊन जनतेचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. त्यामुळे लोकभावनेचा आदर करून मोकाट पाळीव डुकरा पासून निरा शिवतक्रार गाव मुक्त करावे या मागणीकरिताअखिल भारतीय मराठा महासंघ, मुस्लिम सामाजिक संघटना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, (आंबेडकर) यांचेवतीने दिनांक ९ ऑगस्ट  २०२१ रोजी सकाळी १०:००  वाजता क्रांतिदिनी छत्रपती शिवाजी महाराजचौक,ग्रामपंचायतीसमोर, निरा शिवतक्रार येथे मुंडण आंदोलन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याही आंदोलनाची दखल न घेतल्यास यापुढील मूकं निदर्शने आंदोलन मा. अजित दादा पवार सौ. पालकमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे बारामती येथील निवासस्थानासमोर करण्यात येणार असल्याचे सांगीतले.

Read More

निधन वार्ता

पुरंदर  पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील जुन्या पिढीतील धोंडाबाई आबासाहेब कड ( वय ९० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधनझाले.  त्यांच्या मागे एक मुलगा, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. काकू या नावाने त्या परीचित होत्या.  दौंड पंचायत समितीचे सेवानिवृत्त गटविकास अधिकारी वसंतराव कड आणि दिवंगत पत्रकार प्रभाकर कड यांच्या त्यामातोश्री तर सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी बाळासाहेब कड, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ यशवंतराव कड,  भारती सहकारी बँकेचेअध्यक्ष सी ए भाऊसाहेब कड यांच्या त्या काकी तर पत्रकार जीवन कड यांच्या त्या आजी होत्या.

Read More

वाल्हे येथे संत सावतामाळी महाराजांची पुण्यतिथी साधे पणाने साजरी

पुरंदर पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे आज दिनांक ७ ऑगस्ट रोजी भ सकाळी संत सावतामाळी महाराजांची पुण्यतिथी अत्यंत साधे पणाने साजरी करण्यात आली.आज सकाळी पहाटे चंद्रकांत

Read More

अबब !!!!!!!!!! आंबळे बनले कोरोना हॉटस्पॉट तीनच दिवसात तब्बल २० बाधीत

पुरंदर पुरंदर तालुक्यातील आंबळे याठिकाणी तीनच दिवसात तब्बल २० जण कोरोणा पॉझीटीव झाल्याने पुरंदरच्या पुर्व भागातील कोरोणा हॉटस्पॉट बनले आहे. संपुर्ण देशातच कोराणाने पुन्हा डोके

Read More

जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी महावितरण आपल्या दारी…!!

पुरंदर पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार मा श्री संजयजी जगताप यांच्या संकल्पनेतून आणि महावितरणच्या माध्यमातून माळशिरस येथे महावितरण आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी

Read More

जवळार्जुन ग्रामस्थांकडून पूरग्रस्तांसाठी दहा पोती धान्य

पुरंदर पूरग्रस्त बांधवांना मदत करण्यासाठी जवळार्जुन येथील युवकांनी घरोघरी जाऊन कडधान्य स्वरूपात मदत गोळा केली.याउपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.ज्वारी,बाजरी,गहू तांदूळ अशा कडधान्यांची जवळपास दहा पोटी जमाझाली.तसेच इतरही जीवनावश्यक वस्तूंची मदत मिळाली. या उपक्रमासाठी सुजित राणे, नागेश टेकवडे, दादा टेकवडे, सौरभ टेकवडे, पंकज टेकवडे, मयूर टेकवडे, दिनेश टेकवडे, चेतन टेकवडे, काका राणे व इतर सहकाऱ्यांनी घरोघरी जावून मदत गोळा करण्यासाठी परिश्रम घेतले.

Read More