उद्या होणार कॉंग्रेसतर्फे बोंबाबोंब आंदोलन

सासवड केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल,डिझेल आणि घरगुती गँस यांच्या दरवाढीचा तसेच खाद्यतेले यांचे वाढलेले बाजारभाव यामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणार्या त्रासाच्या विरोधात पुरंदर तालुका कॉंग्रेस कमीटीच्या

Read More

शिववसंपर्क अभियानांतर्गत बैठक संपन्न

दि.18 जुलै रोजी अभियानाचे  सत्यवान उभे यांच्या हस्ते होणार उद्घाटन  बारामती  प्रतिनिधि: कल्पना जाधव शिवसेनेच्या गाव तेथे शाखा पोहचवून सभासद नोंदणी करून प्रत्येक शाखेवर जावून दि.12 जुलै ते 24 जुलै 2021 दरम्यानशिवसंपर्क अभियान प्रभावीपणे राबवून हे रयतेचे राज्य असल्याची अनुभूती जनसामान्यांना करून देण्यासाठी माळेगाव(ता.बारामती) याठिकाणी बारामती तालुका महिला संघटक सौ.कल्पना जाधव (काटकर) यांच्या नेतृत्वाखालीतालुक्यातील महिलांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस शिवसेना बारामती तालुकाप्रमुख विश्र्वास मांढरे, माळेगाव खुर्द शाखा प्रमुख नितीन काटे यांचे मोलाचेमार्गदर्शन लाभले. या बैठकीत महिला ध्येय धोरणांची माहिती देण्यात आली. यावेळी सारीका आटोळे, जोस्ना सोलनकर, राजश्री पवार, संगिता शिंदे, ताई अवघडे, सायली मोरे, अश्र्विनी सावंत, सुनिता अडागळे, प्रविणा सस्ते, निता कुचेकर, मिनाक्षी जाधव, सारिका खोमणे, अनिता जगताप, योगिता वाईकर इ. महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला  दि.18 जुलै रोजी शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ होणार आहे. संपर्क प्रमुख सत्यवान उभे यांच्या हस्ते उद्घाटन होणारआहे. यावेळी शिवसेना सह संपर्क प्रमुख ऍड.राजेंद्र काळे,जिल्हा प्रमुख रमेश कोंडे व महिला संघटक संपर्क प्रमुखशालीनीताई देशपांडे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

Read More

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खेड घाट बायपास रस्त्याचे उद्घाटन व लोकार्पण आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या शुभहस्ते संपन्न

पुणे खेड घाटाच्या पायथ्याशी झालेल्या या लोकार्पण सोहळ्याला स्थानिक ग्रामस्थ व प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची लक्षणीयउपस्थिती होती. या कामाचे खरे श्रेय हे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे आहे. मी फक्त कर्तव्य म्हणून हा प्रकल्प पूर्णकरण्यासाठी व आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे खेडघाटाचे लोकार्पण या शेतकऱ्यांच्याहस्ते करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता असे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगीतले. त्यानुसार दत्तात्रय कोरडे, देवराम थिगळे, दशरथ थिगळे, तुकाईवाडीच्या सरपंच कुसुम भांबुरे यांच्या हस्ते हा लोकार्पणसोहळा पार पडला. या कार्यक्रमाला आमदार श्री. दिलीपअण्णा मोहिते पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. निर्मलाताई पानसरे, तालुकाध्यक्षश्री. कैलास सांडभोर, सभापती श्री. विनायक घुमटकर, महिला तालुकाध्यक्ष सौ. संध्याताई जाधव, युवती अध्यक्ष आशातांबे कांचन ढमाले, युवक अध्यक्ष कैलास लिंभोरे, युवक जिल्हाध्यक्ष सोमनाथ दौंडकर, विजय डोळस, दिलीप मेदगे, अरुण चांभारे, बाबा राक्षे, विलास कातोरे, बाळशेठ ठाकूर, रामदास ठाकूर, दादा इंगवले, सुभाष होले, नवनाथ होले, अरुण थिगळे, धैर्यशील पानसरे, मनीषा सांडभोर व अन्य पदाधिकारी, तुकाईवाडी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदीउपस्थित होते.

Read More

पिडीत कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढा देणार:दौलतनाना शितोळे

पुणे दौंड तालुक्यातील पाटस येथील रामोशी समाजातील दोन तरुणांची निर्घुन हत्या झाली होती याच्या निषेधार्थ दौंडतहसील कार्यालया समोर जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भव्य निषेध सभेचे आयोजन करण्यातआले होते ही निषेध सभा यशस्वीरित्या संपन्न झाली असून जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी उठवलेलाआवाज महाराष्ट्र शासना पर्यंत पोहोचवू आसे आश्वासन दौंड तहसीलदार यांनी दिले आहे. पाटस प्रकरणातील अनेक गुन्हेगार आरोपी यांना आटक केली आहे काही संशयित आरोपी फरारच आहे त्यांना तात्काळआटक करावी व मोक्याअंतर्गत कारवाई करावी तसेच ही केस फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालावी यासाठी जय मल्हार क्रांतीसंघटना पाठपुरावा करणार व पिडीत कुटूंबाला न्याय मिळेपर्यंत जय मल्हार लढा देणार,  तसचे महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये, तालुक्यामध्ये रामोशी-बेरड समाजातील युवकांना आणि निराधार बांधवांनाअशा प्रकारचा अन्याय सहन करावा लागत आहे राजकीय व प्रस्थापित लोकांकडून रामोशी-बेरड समाजाची जाणीवपूर्वककुचंबना केली जात आहे तरी या सर्व घटनांचा विचार करून रामोशी-बेरड समाजाला ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत संरक्षणमिळावे यासाठी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आवाज उठवून व शासन दरबारी पाठपुरावाकरण्यात येणार असल्याची माहिती जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षलोकनेते.मा.श्री.दौलतनाना शितोळे साहेब यांनी आपल्या भाषणातून दिली आहे. तसेच या निषेध सभेला वंचित बहुजन आघाडी व वडार समाज पाटस ग्रामपंचायत यांच्या वतीने पदाधिकारी उपस्थितराहून जाहीर सक्रिय पाठिंबा दिला आहे. यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

Read More

“कोविड काळात गावपातळीवर पोलिस पाटलांचे खुप मोठे योगदान : अजित पवार” मुख्यमंत्री सहायता निधीस मदत,पुणे जिल्हा पोलिस पाटील संघाचा स्तुत्य उपक्रम

मुंबई पुणे जिल्हा गावकामगार पोलिस पाटील संघाच्या वतीने १३ लाख ३२ हजार रुपयांचा धनादेश कोविड १९ च्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे

Read More

नीरा येथे एकाचा गोळी घालून खून

नीरा                         नीरा(ता.पुरंदर) येथील कुप्रसिद्ध गुंड  गणेश विठ्ठल रासकर ( वय- ४१)  यांच्यावर अज्ञाताने शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबारकेला. या गोळीबारात गुंड गणेश रासकर यांचा मृत्यू झाला.            घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,शुक्रवारी (दि.१६) सात वाजण्याच्या सुमारास पुणे -पंढरपुर यापालखी मार्गावर रेल्वे स्टेशनसमोरील एका दुकानाजवळ गुंड गणेश रासकर पल्सर गाडीवर आला होता. त्यावेळीअज्ञातांनी गणेश रासकर याच्यावर पाठीमागून गोळी झाडली असता ती गोळी पुढे निघाली. त्याला नीरा येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारापुर्वीच तो मृत्यूमुखी पडला असल्याचे वैद्यकीय अधिका-यांनीघोषित केले.

Read More

पुरंदर तालुक्यात आज ५२ जण कोरोना पॉझीटीव

सासवड पुरंदर तालुक्यामध्ये आज केलेल्या एकुण ५४२ संशयीत रुग्णांच्या तपासणीमध्ये तब्बल ५२ रुग्णांचा अहवाल हा कोरोणा पॉझीटीव आला आहे. पुरंदर तालुक्यामध्ये आज ३९ रुग्ण बरे

Read More

वीजबिल न भरल्यास महावितरण वायरसह मीटरही काढणार

मुख्य अभियंता सुनील पावडे यांचे निर्देश बारामती वारंवार संधी देऊनही वीजबिल भरण्यास कानाडोळा करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणने कठोर कारवाई सुरु केली आहे. जुलै अखेर मुख्यालयाने दिलेले १८१३ कोटी रुपयांच्या वसूलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महावितरणने कंबर कसली असून, थकबाकीदारांचे मीटर-वायर काढून आणण्याचे आदेश बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी सोलापूर, सातारा व बारामती मंडलातील अभियंत्यांना आढावा बैठकीत दिले आहेत. कारवाई टाळायची असेल तर तातडीने थकीतवीजबिल भरुन सहकार्य करण्याचे आवाहनही पावडे यांनी केले आहे. कोरोना महामारीत अखंड वीज देऊनही ग्राहकांनी वीजबिल भरण्यास हात आखडता घेतल्याने महावितरणची आर्थिकस्थिती दोलायमान झाली आहे. दरमहाच्या वीज खरेदी व कर्मचाऱ्यांचा पगारासह वितरणाचा खर्च भागवणेही अशक्यझाल्याने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी राज्यभरात कठोरवसुली मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांच्यामार्गदर्शनाखाली मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी प्रत्येक विभाग व उपविभागनिहाय पथके तयार केली आहेत. ही पथकेवीजबिल वसूलीसोबत वीजचोरांवर कारवाई करणार आहेत. उद्दिष्टपूर्ती न करता कामात कुचराई करणाऱ्या अधिकारीकर्मचाऱ्यांना पाठीशी न घालता त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. बारामती परिमंडलाची वीजबिल थकबाकी सहा हजार कोटींच्या पुढे गेली आहे. गेली वर्षभरापासून वीजबिल न भरणाऱ्याघरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ९० हजार ९४८ ग्राहकांकडे ६४ कोटी ४९ लाख थकबाकी आहे. यातलाखांहून अधिक थकबाकी असलेले ८३९ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे १९ कोटींहून अधिक थकले आहेत. त्यांचेवर तात्काळकारवाई केली जात आहे.  कृषीपंप ग्राहकांना त्यांचे वीजबिल भरणे सुलभ व्हावे म्हणून शासनाने त्यांच्यासाठी ‘कृषी ऊर्जा अभियाना’च्या माध्यमातूनसवलत देणारी योजना आणली आहे. यामध्ये किमान ५० टक्के ते ६६ टक्के माफी मिळते. योजनेत परिमंडलाने ४२०कोटींची वसूली केली आहे. ७५ हजार ७८५ शेतकऱ्यांनी सुधारित थकबाकीच्या ५० टक्के १२३.९२ अधिक चालूबिलापोटी ३४.२९ कोटी रुपये भरले आहेत. त्यांचे १२३.९२ कोटी माफ झाले आहेत. तर बहुतांश अंशत: थकबाकी भरुनसहभाग नोंदवला आहे. त्यांनी उर्वरित रक्कम भरणे गरजचे आहे. ५० टक्के सवलत योजनेची मुदत ३१ मार्च २०२२ असलीतरी सर्व शेतकरी ग्राहकांनी सप्टेंबर २०२० पासूनची सर्व त्रैमासिक चालू बिले भरणे अनिवार्य असून, जे भरणार नाहीतत्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देशही सर्व अभियंत्यांना दिलेले आहेत.

Read More

शंभर तासातच आवळल्या आरोपीच्या मुसक्या

सासवड पोलीस स्टेशनची नेत्रदीपक कामगिरी, खून खटल्यातील आरोपीला नेपाळमध्ये केलेजेरबंद. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांच्या टिमचे सर्वत्र कौतुक, सासवड  दिनांक ९/७/२०२१ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सोनोरी रस्त्यावर बोरकर वस्ती लगत एका नाल्याच्याठिकाणी भगवान मारकड याच्या मृतदेह आढळून आला होता. त्याच्या डोक्यात घातक शस्त्राने वार करून त्यांची हत्याकरण्यात आली होती. मयत भगवान मारकड  यांच्या पत्नी छाया भगवान मारकड यांनी दिलेल्या तक्रारीवरून सासवडपोलीस स्टेशन येथे दिनांक  ९/७/२१ रोजी खुनाचा गुन्हा अज्ञात आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आला होता.सदरगुन्ह्याचा           तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप हे करीत  होते. हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्यानेघटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते व उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी भेटदेऊन पोलिसांना त्वरित गुन्हा उघड करण्याबाबत आदेश दिले होते.         भगवान मारकड हा सोनोरी रोडवरील एका रिमोल्डिंग टायर च्या दुकानात मजुरी ने काम करीत होता. त्याला दारू पिण्याचेव्यसन होते. तो नेहमी दारू पीत होता. दारू पिण्या मध्ये भांडणे होऊन त्याचा खून झाला असावा असा पोलिसांना संशयवाटत होता. ज्या ठिकाणी प्रेत सापडले होते तेथून जवळच असलेल्या सचिन बोरकर यांच्या घरामध्ये नेपाळी इसमसासवडमध्ये फर्निचर चे काम करीत होता, तो भाड्याने राहत होता. तो इसम गुन्हा झाल्यापासून गायब असल्याचेपोलिसांना समजले. तो धागा पकडून त्याचे व भगवान मारकड  यांचे काही संबंध होते का याबाबत पोलिसांनी तपासकेला. यावेळी अशी माहिती मिळाली की हे दोघे जण दारू पीत होते. पार्टी करीत असायचे. घटनेच्या आदल्या दिवशी मयत भगवान व संशयित फर्निचरचे काम करणारा नेपाळी इसम निरंजन सहानी याने सायंकाळी८ वाजण्याच्या सुमारास त्याच्या रूमवर दारू मटण पार्टी केली. पार्टी सुरू असताना दोघांमध्ये किरकोळ गोष्टीवरूनबोलाचाली वरून वाद निर्माण झाला. व निरंजन साहानी याने लाकडी दांडक्याने भगवान मारकड याच्या डोक्यात मारहाणकेली. भगवान मारकड यास गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. व रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होऊन त्याचा मृत्यू झाला.            मृत्यू नंतर निरंजन याने त्याचे प्रेत ओडत कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी, नाल्यां मध्ये फेकून दिले. व रात्रीमोटरसायकलने नेपाळ कडे रवाना झाला.          सासवड पोलिसांनी संशयित आरोपीला माहिती मिळताच त्वरित सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, व्हि टी भोर , निलेश जाधव असे पथक नेपाळ करता रवाना झाले. नेपाळ बॉर्डरवर पोहोचण्या पूर्वी आरोपी हा घरी नेपाळ येथे पोचलाहोता. नेपाळमध्ये जाऊन आरोपीला अटक करून शकत नाही. त्यामुळे आरोपीला अटक करण्यासाठी खूप तांत्रिक अडचणीआल्या होत्या. स्थानिक पोलिसांचे सहकार्य मिळत नव्हते.  अशा वेळी मोबाईल कंपनीचे नोडल ऑफिसर तुषार यांनी अतिशय मोलाचे तांत्रिक मदत केली. सहाय्यक पोलीसनिरीक्षक राहुल घुगे यांनी आपल्या कौशल्य व अनुभव पणाला लावून आरोपीला नेपाळ बॉर्डरवर अत्यंत चलाखीने ताब्यातघेतले. व सासवड स्टेशन येथे आणले. 

Read More

नावाचे पावित्र का राखले जाते का?

निरा छत्रपती शिवाजी महाराज चौक निरा शिवतक्रार अभिमानाने जनतेने या चौकाला नाव दिले. परंतु त्याचे पावित्र्य राखलेजात नाही.  या चौकात स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिनाचे कार्यक्रम होतात. देशावर कोणतेही संकटआले तरी जनता न सांगता या चौकात धावून येते. परंतु महाराजांचे विषयी अभिमान असणार्‍या या चौकात महाराजांचे नावाचा साधा नाम फलक सुद्धा नाही. त्यातचवाढदिवस, पदावरील निवड, भावपूर्ण श्रद्धांजली आणि जाहिराती चे फलक कायम लागलेले असतात. त्यामुळे या चौकाचेनाव बदलले जाते की काय याची भीती वाटायला लागलेली आहे. कोरोना महा मारीत अनेक भावपूर्ण श्रद्धांजली चे फलकपाहावे लागत असलेने प्रवाशावर व जनतेवर दडपण येत होते. आजार कमी होण्याऐवजी बळावले जात होते. वाढदिवस वपदावरील निवड हे फलक तर कायमच. आशा फलकामुळे रहदारीस अडथळा येत आहे व त्यांच्याकडे पाहता पाहताअपघात होत आहेत. गावाचे भूषण असलेला चौक परंतु लोक चौकाचे कडेला उघड्यावरच लघुशंका करीत आहेत. अशा फलकांना पोलीस व ग्रामपंचायत परवान्याची आवश्यकता असते. या पूर्वीचे पोलीस अधिकारी श्री. अंकुश मानेयांनी कडक नियम राबवले होते. त्यामुळे बेकायदेशीर फलकावर अंकुश होता.  ग्रामपंचायतीला हे एक उत्पन्नवाढीचेसाधन आहे परंतु याबाबत त्यांची उदासीनता दिसून येते. दुखवायचे कोणाला. वाल्हे येथील एका सुशिक्षित नेत्याने व बारामती तालुक्यात प्रत्येक ठिकाणी महिला नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त असेफलक न लावता जनतेच्या कोरोना लसीकरणाला प्राधान्य दिले परंतु येथे असे झालेले दिसून येत नाही. जनता राम भरोसेकोणाचे कोणाला सोयरसुतक नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौक निरा शिवतक्रार बाबत उदासीन राज्यकर्ते काही करत नसतील तर महाराजांचे व गावाविषयी अभिमान असणारे एक संघटन स्वच्छ नीरा सुंदर निरा या तत्त्वाप्रमाणे चौकाचे सुशोभिकरण करणार आहे?

Read More