निरा निरा शिवतक्रार गावात फिरणाऱ्या मोकाट पाळीव डुकरा मुळे मंदिरे, मशिदी, स्मशानभूमी या ठिकाणी धार्मिक भावनादुखावणे. डुकरा मुळे होणारे अपघात, निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न, शेतीचे नुकसान, दूषित होणारे पाणी आणिव्यापाऱ्यांचे होणारे नुकसान इत्यादी प्रश्न निर्माण होत असलेले लोकभावनेचा आदर करून मोकाट पाळीव डुकरांचे समूळउच्चाटन व्हावे या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघ व इतर सामाजिक संघटना गेले वर्षभरापासून उपोषणआंदोलनाद्वारे ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करीत आहे. स्वच्छ निरा, सुंदर निरा कागदावरच ब्रीद वाक्य असलेले ग्रामपंचायत निरा शिवतक्रार प्रशासन जनतेच्या आरोग्याचा प्रश्नहाताळण्यात अपयशी ठरलेले असून त्यांची मोकाट पाळीव डुकरांचा प्रश्न हाताळण्यात उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे गावात गंभीर आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊन जनतेचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. त्यामुळे लोकभावनेचा आदर करून मोकाट पाळीव डुकरा पासून निरा शिवतक्रार गाव मुक्त करावे या मागणीकरिताअखिल भारतीय मराठा महासंघ, मुस्लिम सामाजिक संघटना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, (आंबेडकर) यांचेवतीने दिनांक ९ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी १०:०० वाजता क्रांतिदिनी छत्रपती शिवाजी महाराजचौक,ग्रामपंचायतीसमोर, निरा शिवतक्रार येथे मुंडण आंदोलन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याही आंदोलनाची दखल न घेतल्यास यापुढील मूकं निदर्शने आंदोलन मा. अजित दादा पवार सौ. पालकमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे बारामती येथील निवासस्थानासमोर करण्यात येणार असल्याचे सांगीतले.
Maharashtra City: पुणे
निधन वार्ता
पुरंदर पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील जुन्या पिढीतील धोंडाबाई आबासाहेब कड ( वय ९० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधनझाले. त्यांच्या मागे एक मुलगा, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. काकू या नावाने त्या परीचित होत्या. दौंड पंचायत समितीचे सेवानिवृत्त गटविकास अधिकारी वसंतराव कड आणि दिवंगत पत्रकार प्रभाकर कड यांच्या त्यामातोश्री तर सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी बाळासाहेब कड, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ यशवंतराव कड, भारती सहकारी बँकेचेअध्यक्ष सी ए भाऊसाहेब कड यांच्या त्या काकी तर पत्रकार जीवन कड यांच्या त्या आजी होत्या.
वाल्हे येथे संत सावतामाळी महाराजांची पुण्यतिथी साधे पणाने साजरी
पुरंदर पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे आज दिनांक ७ ऑगस्ट रोजी भ सकाळी संत सावतामाळी महाराजांची पुण्यतिथी अत्यंत साधे पणाने साजरी करण्यात आली.आज सकाळी पहाटे चंद्रकांत
अबब !!!!!!!!!! आंबळे बनले कोरोना हॉटस्पॉट तीनच दिवसात तब्बल २० बाधीत
पुरंदर पुरंदर तालुक्यातील आंबळे याठिकाणी तीनच दिवसात तब्बल २० जण कोरोणा पॉझीटीव झाल्याने पुरंदरच्या पुर्व भागातील कोरोणा हॉटस्पॉट बनले आहे. संपुर्ण देशातच कोराणाने पुन्हा डोके
जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी महावितरण आपल्या दारी…!!
पुरंदर पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार मा श्री संजयजी जगताप यांच्या संकल्पनेतून आणि महावितरणच्या माध्यमातून माळशिरस येथे महावितरण आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी
जवळार्जुन ग्रामस्थांकडून पूरग्रस्तांसाठी दहा पोती धान्य
पुरंदर पूरग्रस्त बांधवांना मदत करण्यासाठी जवळार्जुन येथील युवकांनी घरोघरी जाऊन कडधान्य स्वरूपात मदत गोळा केली.याउपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.ज्वारी,बाजरी,गहू तांदूळ अशा कडधान्यांची जवळपास दहा पोटी जमाझाली.तसेच इतरही जीवनावश्यक वस्तूंची मदत मिळाली. या उपक्रमासाठी सुजित राणे, नागेश टेकवडे, दादा टेकवडे, सौरभ टेकवडे, पंकज टेकवडे, मयूर टेकवडे, दिनेश टेकवडे, चेतन टेकवडे, काका राणे व इतर सहकाऱ्यांनी घरोघरी जावून मदत गोळा करण्यासाठी परिश्रम घेतले.
शिवतारेंनी घेतली जयंत पाटलांची भेट गुंजवणीचे काम चालू करण्याचे मंत्र्यांचे निर्देश
पुरंदर दरम्यान याबाबत शिवतारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जयंत पाटील माझे अनेक वर्षापासूनचे मित्र आहेत. त्यांनी काम सुरू करण्याचे आदेश दिले असून लवकरात
अपघात टाळण्यासाठी मावडी रस्त्याचा कायापालट. अजिंक्य टेकवडे यांच्या प्रयत्नाला यश.
पुरंदर जेजुरी ते मोरगाव दरम्यान मावडी हद्दीतील रस्ता अतिरिक्त डांबरामुळे गुळगुळीत झाला होता.त्यामुळे या ठिकाणी अनेक दुचाकी स्वारांसह कित्येक वाहन चालकांना देखील अपघातास सामोरे जावे
महापुरुषांच्या जयंतीलाच पदाधीकार्यांना बोलता येत नाही……!!!!!!!
पुरंदर पुरंदर तालुक्यात खुप मोठ्या महापुरुषांनी जन्म घेतलाय. अशाच एका महापुरुषाच्या जयंतीनिमित्त एका गावात गावच्या पदाधिकार्यांना आमंत्रित केल होत. या कार्यक्रमात आजी माजी सरपंच तसेच
मांडकी येथे विकास कामांचे भूमिपूजन…!
पुरंदर पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप , पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप दादा गारटकर ,पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटिल ,यांच्या हस्ते