पुणे
जुन महिना संपुन गेला असुन आता जुलै महिना चालु झाला आहे परंतु पुरंदरच्या पुर्व भागात अजुनही समाधानकारक पाऊस झाला नाही. सुरुवातीला एक पाउस झाल्यानंतर ज्या शेतकर्यांनी पेरणी केली त्यांच्यासहित सर्वच शेतकरी आता आभाळाकडे पाहत बसले आहेत.
अजुनही खरीप हंगामातील पेरण्या झाल्या नाहीत तर पेरणीसाठी १७० ते २०० रुपये किलोने विकत घेतलेले भुईमुगाचे बी अजुनही शेतकर्यांच्या घरातच पडुन आहे
काही शेतकर्यांनी पेरणी केली तर काही शेतकरी अजुनही पावसाचीच वाट पाहत आहेत. पेरणी जरी झाली नसली तरीही शेतीची मशागत करता करता शेतकरी दादा थकला आहे. सध्या कोरोणाचा प्रादुर्भाव असल्याने जगण्याची आशा तर कोरोणाने संपवलीच आहे. शेतकर्याच्या हाती काम नाही कशी बशी पोटाची खळगी भरत असताना पावसाने आशेला लावले व बियाणे खरेदी करुन शेतीची मशागत करायला लावली एवढे सर्व केल्यानंतर आज पाऊस पुर्णपणे उघडलेला असुन ज्यांनी पेरणी केली त्यांच्यावर आता दुबार पेरणीची वेळ आली आहे. शेतकर्यांनी कसे जगावे? पोटाची खळगी कशी भरावी? की कर्ज काढुन उसनवारी करुन शेती करावी ह्या सर्व गोष्टींमुळे शेतकर्याला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पाऊस ज़र झाला नाही तर शेतकर्यांवर उपासमारीची वेळ येणार हे नक्की. आज महागाई गगनाला भिडली आहे त्यातच स्वयंपाकाचा गँस, पेट्रोल, डिझेल तसेच ज्या जीवनावश्यक वस्तु पोटाची खळगी भरायला लागतात त्या वस्तु ईतक्या महाग झाल्यात की काय खावे आणि किती खावे हाच एक प्रश्न मनाला भेडसावत आहे. शेतात काही पिकेना हातात पैसा नाही त्यातच महागाईचा उडालेला भडका त्यामुळे नेमके जगावे कसे हाच सध्या प्रश्न आहे.
त्यातच पाऊस नसल्याने जनावरांना चार्याचा प्रश्न,विकत ज़र चारा आणायचा म्हटल तर तेही सध्या परवडत नाही आणि एवढे सर्व सोपस्कर करुन जनावरे जगवली तर दुधाला भाव नाही याचा अर्थ सरकार फक्त शेतकर्यांच्याच मुळावर उठलय की काय असाच होतोय.
गरीबांच्या अडचणींकडे सुद्धा सरकारने लक्ष दिले पाहिजे पण राजकारणी लोक फक्त एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यातच समाधान मानताना दिसत आहेत पण गरीब, शेतकरी, कष्टकर्यांच्या व्यथा ह्या राजकारण्यांना कधी समजणार? शेतकर्यांच्या अडचणी व दुखणी समजुन घ्या व शेतकर्यांसाठीचे धोरण लवकरात लवकर आमलात यावे अशी मागणी शेतकरी करत आहेत. सर्व शेतकरी आज सरकारला विनंती करीत आहेत की शेती करताना किती कष्ट,किती यातना सहन कराव्या लागतात व रात्री अपरात्री ज्यावेळी लाईट येईल त्यावेळी शेतात जावे लागते ज़र रात्रीचा त्या शेतकर्याला काही अपघात होऊन त्याचा ज़र मृत्यु झाला तर त्याचे पुर्ण कुटुंबच उध्वस्तच होऊन जाते अशा प्रकारचे अनेक अनुत्तरीत प्रश्न कोण सोडवणार पाऊस की सरकार.